शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिक मुक्ती दलाचे आजपासून राज्यव्यापी आंदोलन

By admin | Updated: April 22, 2015 00:27 IST

भारत पाटणकर : धरणातील पाणी अडवणार

सातारा : आजपर्यंत शासनाने केवळ आश्वासने दिली. विविध प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत सरकार उदासीन असल्याचे दिसत आहे. राज्यात तीन लाख कुटुंब विविध प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांच्यासाठी नवीन मागण्या नाही तर मंजूर केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्यातील ११ जिल्ह्यांत ६ एप्रिलपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु आहे. तरीही सरकाराने दखल घेतली नाही. त्यामुळे बुधवार दि. २२ पासून राज्यात विविध ठिकाणच्या धरणातील पाणी अडविण्यात येणार आहे. असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.डॉ. पाटणकर म्हणाले, ६ एप्रिल पासून राज्यातील ११ जिल्ह्यांत्र बेमुद ठिय्या आंदोलन सुरू आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी तुमची बैठक लावतो. तुम्ही आंदोलन स्थगित करा. असे सांगितले होते. परंतु त्यावेळेस आम्ही ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन स्थगित करणार नाही, असे सांगितले होते. आजअखेर मुख्यमंत्र्यांनी बैठकीला बोलावले नाही किंवा चर्चाही केली नाही . यावरुन आमचा निर्णय योग्य होता, हे आता स्पष्ट झाल आहे. या प्रकारामुळेच आमचा शासनावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आता आंदोलन तीव्र करणे अपरिहार्य झाले आहे. मुख्यमंत्री विदेश दौऱ्यावरुन येऊन बरेच दिवस झाले. या काळात ते राज्याच्या विविध भागात गेले, कार्यक्रमांना हजेरी लावली परंतु ज्यांनी राज्याच्या विकासासाठी त्याग केला त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. राज्यात जवळपास ३ लाख कुटुंबे म्हणजे १५ लाखाहून अधिक माणसे विविध प्रकल्पग्रस्त आहेत. एवढया मोठया लोकसंख्येचे प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती राज्यकर्त्यांमध्ये नाही. कोणत्या नवीन मागण्यांसाठी आंदोलन नाही तर निघालेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. ती व्हावी ही आचमी प्रमुख मागणी आहे. या मागणीकडेही सरकार गांभीर्याने बघत नाही. कोयना धरण होऊन इतके वर्ष झाले परंतु त्यांचेही अजून पूर्ण पुनर्वसन झाले नाही. या अंमलबजावणीसाठी एवढा उशीर लागण्याचे कारणच काय त्यामुळे आता बुधवारपासून राज्यात विविध ठिकाणी धरणातील पाणी अडवले जाणार आहे. (प्रतिनिधी)अभयारण्यातील पर्यटकांनाही अडविणार सातारा जिल्हयातील तारळी, उरमोडी, कोयना धरणातील पाणी अडवण्यात येणार आहे. तसेच सांगली आणि कोल्हापूरमधील वारणा धरण तसेच चांदोली अभयारण्याच्या गेटवर पर्यटकांना अडविण्यात येईल. कोल्हापूरच्या पश्चिम भागातील आजरा, चंदगड येथे सुरू असलेल्या धरणाचे काम बंद पाडण्यात येणार आहे. सोलापूरमधील उजनी धरणातून तसेच मराठवाडयातील जायकवडी धरणातून पाणी सोडून देण्यात येणार नाही. सध्याच्या अर्थसंकल्पात उरमोडी, तारळी, वांगसाठी कोणताही निधी देण्यात आलेला नाही.