शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय", पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर!
2
अजित पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी राम-राम ठोकला; या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला
3
३० कोटींची लॉटरी जिंकून पैसे गर्लफ्रेंडला दिले, दुसऱ्यासोबत फुर्र होऊन तिने बॉयफ्रेंडलाच कंगाल केले! 
4
भारताची नवीन 'रेड लाईन', पाकिस्तानात 300 KM घुसून हल्ले, CDS चौहान यांची मोठी माहिती
5
ईशान्य भारतात पावसाचा कहर, भूस्खलनासह विविध कारणांनी ३२ जणांचा मृत्यू  
6
पुढील आठवड्यात शेअर बाजारात 'लिस्टिंगचा धमाका'! १० कंपन्या करणार दणक्यात पदार्पण, गुंतवणूकदारांची चांदी?
7
रोज ६,५०० तरुणांची तंबाखूसेवनाला सुरुवात, दरवर्षी १८ लाख जण गमावतात आपला जीव
8
"संविधानामुळेच आपला देश संकटकाळातही एकसंध"; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विधान
9
कॉलेजचं प्रेम आयुष्यात परतलं, आधीच विवाहित असलेल्या जवानानं पत्नीला संपवलं
10
चालकाला डुलकी लागली, कार थेट दुभाजक ओलांडून ट्रॅकला जाऊन धडकली; एकाचा मृत्यू, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना
11
आनंदाची बातमी...! LPG सिलिंडरची किंमत पुन्हा कमी झाली; 1 जूनपासून ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवा दर
12
फक्त SIP च नाही, आता 'STP' नेही वाढवा म्युच्युअल फंडातला परतावा! जाणून घ्या ही खास योजना!
13
पाकिस्तानमधील जीवितहानीबद्दल शोक करणारे वक्तव्य कोलंबियाने घेतले मागे- शशी थरूर
14
IPL 2025 : पुन्हा 'रोजंदारी'वर मिळालं काम! पण यावेळी MI नं दिला CSK पेक्षा दुप्पट पगार
15
शरीर संबंधास नकार मिळताच पती संतापला, पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला! मुंबईतील धक्कादायक घटना 
16
प्रेमाच्या मैदानात रिंकू सिंहचा महिला खासदाराने उडवला त्रिफळा, ८ जूनला होणार साखरपुडा
17
फक्त २५० रुपयांनी सुरुवात, ७० लाखांपर्यंतचा जमेल निधी! मुलीचे शिक्षण आणि लग्नाची चिंता कायमची मिटेल
18
मोठा अपघात टळला! रुळांवर होते सिमेंट, लोखंडाचे पाईप, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाने वाचले हजारो प्रवाशांचे प्राण 
19
पावसाचा कहर! अरुणाचलमध्ये भूस्खलनात १४ ठार; मिझोराममध्ये घरे कोसळून अनेक जण ठार
20
विशेष लेख: दादा, शिंदे, फडणवीसांचे 'कम्युनिकेशन' अन् एका विधानामुळे पडलेले असंख्य प्रश्न

तोंड सांभाळून बोला, अन्यथा..; राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्याला भानुदास माळींनी दिला इशारा

By प्रमोद सुकरे | Updated: May 28, 2025 15:25 IST

'खरंतर भाजप, आर‌एसएसला महाविकास आघाडीत फूट पाडायचीय'

प्रमोद सुकरे कराड : नाशिक येथील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या काही शिवसैनिकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबाबत गंभीर आणि चुकीची वक्तव्ये केली आहेत. खरंतर राहुल गांधी हे देशाचे भावी पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलताना त्यांनी तोंड सांभाळून बोलावे अन्यथा आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी माध्यमांशी बोलताना दिला. माळी म्हणाले,काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची सावरकरांच्या बाबतची भूमिका ही स्पष्ट आहे. असे असताना देखील नको तो विषय उकरुन काढून तुम्ही जर त्यांच्या तोंडाला काळे फासण्याची भाषा करीत असला तर आम्ही काय तुमच्या तोंडाकडे बघत बसणार आहे का? तुमच्या पुढच्या भूमिका आम्ही मांडू शकतो हे लक्षात ठेवा.

वाचा- "...तर राहुल गांधींना काळं फासू’’, सावरकरांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या नेत्याचा इशाराकाँग्रेस पक्षाला १५० वर्षांची परंपरा आहे. तळागाळात काम करणारा हा पक्ष आहे. त्याचे नेतृत्व राहुल गांधी करत असून त्यांना धमकी देण्याची तुमची लायकी नाही. उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या बाबत काय बोलतात का? याचा अगोदर विचार करा. नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आपल्याला पुन्हा आणायचे आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन जायचे आहे. त्यामुळे आघाडी खड्ड्यात गेली अशा प्रकारची वक्तव्ये तुमच्या तोंडातून शोभत नाहीत. असा समाचार ही माळी यांनी 'त्या' शिवसैनिकांचा घेतला.

कारस्थाने ओळखाखरंतर भाजप व आर‌एसएसला महाविकास आघाडीत फूट पाडायची आहे. त्यामुळे तेच हे षडयंत्र करीत असून शिवसैनिकांना भडकवण्याचे काम करत आहेत. हे षडयंत्र शिवसैनिकांनी ओळखले पाहिजे असेही माळी एका प्रश्नावर बोलताना म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNashikनाशिकUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरBJPभाजपा