लोणंद निरा रोडवर एसटीने दुचाकी स्वारांना चिरडले, तिघेही जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 22:24 IST2023-04-06T22:23:33+5:302023-04-06T22:24:02+5:30
अपघातात ठार झालेले तीनही युवक पिपंरे खुर्द तालुका पुरंदर येथील आहेत.

लोणंद निरा रोडवर एसटीने दुचाकी स्वारांना चिरडले, तिघेही जागीच ठार
सातारा - लोणंद निरा रोडवर लोणंदपासून दोन किलोमीटर अंतरावरील रेल्वे उड्डाण पुलावर एसटी व मोटारसायकलच्या धडकेत मोटारसायकल वरील तीन युवक जागीच ठार झाले. अपघातात ठार झालेले तीनही युवक पिपंरे खुर्द तालुका पुरंदर येथील आहेत.
लोणंद-निरा रोडवर लोणंदपासून दोन किलोमीटर अंतरावरीलल रेल्वे उड्डाणपुलाजवळ मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेली एसटी बस क्रमांक एम एच 20 बी एल 4158 व निरेकडून लोणंदला निघालेली मोटरसायकल क्रमांक एम एच 12 RV 3158 यांच्यात जोरदार धडक झाली.
या अपघातात ओकांर संजय थोपटे, पोपट अर्जुन थोपटे आणि अनिल नामदेव थोपटे (सर्व रा. पिपंरे खुर्द ता. पुरंधर) हे तीनही तरुण जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर पीएसआय गणेश माने व त्यांचे सहकार्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.
अपघातातील वाहने बाजूला करून मृतदेह लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या ठिकाणची वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. अपघातात ठार झालेले तीनही युवक पिंपरे खुर्द ता. पुरंदर येथील असल्याचे समजले. या गुन्ह्याची नोंद रात्री उशिरा लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात येत होती.