साताऱ्यात चोरलेले सोने मुंबईत विकले ; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 15:38 IST2018-05-14T15:38:06+5:302018-05-14T15:38:06+5:30

साताऱ्यात घरफोडी करून चोरलेले सोन्याचे दागिने मुंबईत विकणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. दत्ता उत्तम घाडगे व जयसिंग विनोद केदार असे दोघा संशयित आरोपींचे नावे आहेत.

Sold gold stolen in Satara; Both arrested | साताऱ्यात चोरलेले सोने मुंबईत विकले ; दोघांना अटक

साताऱ्यात चोरलेले सोने मुंबईत विकले ; दोघांना अटक

ठळक मुद्देसाताऱ्यात चोरलेले सोने मुंबईत विकले सराईत गुन्हेगार ताब्यात, दोघांना अटक

सातारा : साताऱ्यात घरफोडी करून चोरलेले सोन्याचे दागिने मुंबईत विकणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. दत्ता उत्तम घाडगे व जयसिंग विनोद केदार असे दोघा संशयित आरोपींचे नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, करंजे पेठ येथील घरात चावी घेऊन कपाटातील ६४ हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी केली.

शाहूपुरी पोलिसांनी सराईत गुन्हेगार दत्ता घाडगेला ताब्यात घेतले. त्याने मुद्देमाल मानखुर्द मुंबई येथे विकल्याची कबुली दिली.

त्यानंतर पोलीस पथकाने मुंबई येथून ३२ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह जयसिंग केदारला अटक केली.

Web Title: Sold gold stolen in Satara; Both arrested