घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:54 AM2018-12-20T00:54:36+5:302018-12-20T00:54:53+5:30

घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा १९ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना कार्बन नाका परिसरात घडली आहे़

 Burglar gold jewelery theft | घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी

घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी

Next

नाशिक : घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा १९ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना कार्बन नाका परिसरात घडली आहे़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ९ ते १२ डिसेंबर या कालावधीत चोरट्यांनी राजेंद्र चव्हाण (रूम नंबर २४८१, संकल्प हॉस्पिटलमागे) यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला़ तसेच घरातील ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप, ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे १२ मणी व पाच हजार रुपयांची रोकड असा १९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेची आत्महत्या
पाथर्डी फाट्यावरील स्वराजनगरमधील वृद्धेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ दुर्गा सुरेश जाधव (६०, रा. नरहरी लॉन्सजवळ, स्वराजनगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे़ १३ डिसेंबर रोजी सायंकाळी दुर्गा जाधव यांनी विषारी औषध सेवन केले होते़ ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सातपूरच्या शिवाजीनगरमधील अहिल्याबाई होळकर चौकातील अक्षय राजपूत यांची २० हजार रुपये किमतीची डिस्कव्हर दुचाकी (एमएच १५, सीझेड १२०१) चोरट्यांनी घराजवळून चोरून नेली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंजमाळला तरुणास मारहाण
कुरापत काढून गंजमाळ परिसरातील युवकास चार-पाच संशयितांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि़१८) रात्रीच्या सुमारास म्हसोबा मंदिराजवळ घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंटी गोरख सूर्यवंशी (२१, रा. म्हसोबा मंदिराजवळ, भीमवाडी, गंजमाळ) यास मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संशयित रोहित ज्ञानेश्वर सोळसे, सागर ज्ञानेश्वर सोळसे व त्यांचे दोन मित्र (सर्व रा. भीमवाडी, गंजमाळ) यांनी अडवून कुरापत काढून कटर गालावर मारून दुखापत केली़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केवडीबनातून दुचाकीची चोरी
केवडीबनातील हिना उद्योगजवळील रहिवासी ज्ञानेश्वर कोकाटे यांची दुचाकी (एमएच १५, एव्ही १६५२) व दोन हजार रुपये किमतीचा लिनोव्हो मोबाइल चोरट्यांनी राहत्या घराजवळून चोरून नेला़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्बन नाका भागातून दुचाकीची चोरी
सातपूरच्या कार्बन नाका भागातील संकल्प हॉस्पिटलच्या समोरून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Burglar gold jewelery theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.