सोशल डिस्टन्सचा बाजारपेठेत फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST2021-01-08T06:08:38+5:302021-01-08T06:08:38+5:30

सातारा : संचारबंदीच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाजारपेठेत सकाळी नऊ ते सायंकाळी नऊ या वेळेत नागरिक मोठ्या ...

Social distance market fuss | सोशल डिस्टन्सचा बाजारपेठेत फज्जा

सोशल डिस्टन्सचा बाजारपेठेत फज्जा

सातारा : संचारबंदीच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाजारपेठेत सकाळी नऊ ते सायंकाळी नऊ या वेळेत नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी गर्दी करीत आहे. वाढत्या गर्दीवर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. शहरातील खणआळी, मोती चौक, राजवाडा, जुना मोटर स्टॅँड, पाचशे एक पाटी या ठिकाणी खरेदीसाठी झुंबड उडत आहे. नागरिकांसह दुकानदारांकडूनही सोशल डिस्टन्सचे उल्लंघन होत आहे. पालिकेकडून सुरू करण्यात आलेली दंडात्मक कारवाई बारगळल्याने विक्रेते व दुकानदार निर्धास्त झाले आहेत.

सोनगाव डेपोतील

कचरा थेट रस्त्यावर

सातारा : सातारा शहरातून संकलित केला जाणार कचरा पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोत टाकला जातो. वाऱ्यामुळे हा कचरा रस्त्यावर येत असल्याने याचा सोनगाव, शेंद्र परिसरातील ग्रामस्थ व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. डेपोच्या बाहेर रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग साचत आहे. शिवाय संरक्षक भिंतीखालूनही हा कचरा रस्त्यावर येत आहे. पालिकेने डेपोच्या बाहेरही स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांसह वाहनधारकांमधून केली जात आहे.

खंडाळा-लोणंद

रस्त्यावर खड्डेच खड्डे

खंडाळा : खंडाळा-लोणंद रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गावरून ये-जा करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे खड्डे खडी व मुरूम टाकून बुजविण्यात आले. मात्र, काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. रस्त्याच्या साईडपट्ट्यादेखील मोठ्या प्रमाणात खचल्या आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, या मार्गाचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Social distance market fuss