Satara: मांडीवर घेऊन आई जेवण भरवत होती, पायाला चावताच चिमुकली ओरडली; दुर्लक्ष केले, अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 14:43 IST2025-09-26T14:38:56+5:302025-09-26T14:43:36+5:30
..अन् नंतर घरातील लोक भयभीत झाले

Satara: मांडीवर घेऊन आई जेवण भरवत होती, पायाला चावताच चिमुकली ओरडली; दुर्लक्ष केले, अन्..
सातारा : चार वर्षांच्या मुलीला मांडीवर घेऊन आई जेवण भरवत असताना सर्पदंश झाल्याने मुलीचा काही तासांतच मृत्यू झाला. ही घटना केळघर, ता. जावळी येथे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता घडली.
श्रीशा मिलिंद घाडगे (वय ४, रा. केळघर, ता. जावळी) असे सर्पदंश होऊन मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. श्रीशा हिची आई तिला मांडीवर बसवून भात भरवत होती. त्यावेळी श्रीशा हिच्या पायाला सर्पदंश झाला. तेव्हा ती ओरडली. पण आईला वाटले, उंदीर असेल म्हणून दुर्लक्ष केले.
वाचा- सतत रडणाऱ्या चिमुकलीच्या तोंडात आईने कोंबला बोळा, गुदमरून झाला मृत्यू; रत्नागिरीतील धक्कादायक घटना
मात्र, काही वेळानंतर घरातील बिळातून साप बाहेर आल्याचे त्यांना दिसले. यानंतर घरातील लोक भयभीत झाले. श्रीशाला तातडीने साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.