शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा ‘जॅकपॉट’ कुणाकुणाला?

By admin | Updated: September 16, 2014 23:29 IST

जागावाटपाची प्रतीक्षा : स्वबळाची घोषणा झाल्यास प्रत्येक मतदारसंघात इच्छुक दबा धरून

राजीव मुळ्ये - सातारा -शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून वरिष्ठ पातळीवर अजून समझोता झालेला नाही. ‘युती’ची ‘महायुती’ झाल्याने जागावाटप आणखी जटिल बनले आहे. जागावाटप गुण्यागोविंदाने झाल्यास शिवसेनेला कोणकोणत्या जागा सुटतील आणि तेथे उमेदवारीचा ‘जॅकपॉट’ कुणाकुणाला लागेल, याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. शिवसेनेचे तिकीट कोणाला, या प्रश्नाला दोन पर्याय प्रत्येक मतदारसंघातून येत आहेत. एक म्हणजे स्वबळावर लढल्यास तिकीट कुणाला आणि जागावाटपाचे जुळल्यास कुणाला? लोकसभा निवडणुकीतील अनुभवांनंतर वरिष्ठ पातळीवर जशी पक्षांतराची लाट आली, तशीच स्थानिक पातळीवरही आली. अनेकांनी काँग्रेस आघाडीतून शिवसेनेत किंवा भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभेला इच्छुक असल्याचे दाखवून देणे हाच पक्षांतरांमागचा मुख्य हेतू! परंतु इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असतानाच वरिष्ठ पातळीवरच जागावाटपाचा निर्णय खोळंबला असून सर्वांचाच रक्तदाब वाढला आहे.शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवावी, असे म्हणणारा कार्यकर्त्यांचा वर्ग सातारा जिल्ह्यातही काही कमी नाही. तशी वेळ आल्यास प्रत्येक मतदारसंघात इच्छुक दबा धरून आहेत. कोरेगावातून हणमंत चवरे आणि दिनेश बर्गे इच्छुक आहेत. साताऱ्यातून नरेंद्र पाटील, राजेंद्र कुंभारदरे यांच्याबरोबरच आम आदमी पक्षाचा झाडू टाकून धनुष्यबाण हाती घेतलेले राजेंद्र चोरगेही रांगेत आहेत. पाटणमध्ये शंभूराज देसार्इंव्यतिरिक्त आणखी कोणीच इच्छुक नाही आणि असलाच तरी त्याची डाळ शिजणे शक्य नाही. युती होवो वा स्वबळावर निवडणूक होवो, शंभूराज आखाड्यात असणारच! ‘कऱ्हाड दक्षिण’मधून संजय मोहिते तर ‘कऱ्हाड उत्तर’मधून पृथ्वी शिरगावकर इच्छुक आहेत. वाई मतदारसंघात डी. एम. बावळेकर शिवसेनेच्या तिकिटाचे प्रमुख दावेदार मानले जात असले, तरी स्वबळावर लढायचे झाल्यास दगडू सपकाळ यांना तिकीट द्यावे, अशी मागणी करणारा कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग आहे. याखेरीज महेश शिंदे आणि नंदकुमार घाडगेही वाईतून इच्छुक आहेत. माणमधून धनाजी सावंत, तर फलटणमधून माजी आमदार बाबुराव माने इच्छुक आहेत.