कोयना प्रकल्पग्रस्तांचा शासनाच्या नावाने ‘शिमगा’ : आंदोलनस्थळीच होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 10:44 PM2018-03-02T22:44:36+5:302018-03-02T22:44:36+5:30

कोयनानगर : कोयना प्रकल्पग्रस्त आता करो या मरो या भूमिकेत असून, गुरुवारी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनस्थळीच होळीचा सण साजरा केला.

 'Shimga' under the name of government of Koyna project affected: Holi | कोयना प्रकल्पग्रस्तांचा शासनाच्या नावाने ‘शिमगा’ : आंदोलनस्थळीच होळी

कोयना प्रकल्पग्रस्तांचा शासनाच्या नावाने ‘शिमगा’ : आंदोलनस्थळीच होळी

Next

कोयनानगर : कोयना प्रकल्पग्रस्त आता करो या मरो या भूमिकेत असून, गुरुवारी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनस्थळीच होळीचा सण साजरा केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या नावाने अक्षरश: ‘शिमगा’ करीत बोंब ठोकली.

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाकडे जिल्हाधिकारी अथवा तहसीलदारांनीही पाहिलेले नाही. त्यांनी या आंदोलनाची कसलीच दखल घेतली नाही. शासनाकडून होत असलेली अवहेलना आणि राज्यकर्त्यांकडून होणारे वेळकाढू धोरण यामुळे गेल्या ६४ वर्षांत येथील जनता वैतागून गेली आहे. प्रकल्पग्रस्तांनी सुरुवातीला सातारा आणि नंतर कोयनानगर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. धरणग्रस्त हजारोच्या संख्येने या आंदोलनास बसले आहेत. मुख्यमंत्र्यांना नदीकाठी गाण्याच्या तालावर नाचायला वेळ आहे; पण आम्हा प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. मुंबईहून आलेले चाकरमानीही या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

कोयना प्रकल्पाचे सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता कुमार पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली. मागण्यांचे प्रस्ताव त्वरित शासनस्तरावर पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी डॉ. भारत पाटणकर यांच्यासह आंदोलकांनी आंदोलनस्थळी होळी साजरी केली. तसेच शासनाच्या नावाने ‘बोंब’ ठोकली. यावेळी महिलांनी होळीची गाणी म्हटली. ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा,’ ‘धरण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,’ यासारख्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. होळीचे सर्व कार्यक्रम आंदोलकांनी विधिवत आंदोलनस्थळी साजरे केले. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे हरिश्चंद्र दळवी, विठ्ठल सपकाळ, संजय लाड, परशुराम शिर्के , सीताराम पवार, चैतन्य दळवी, महेश शेलार, सचिन कदम, दाजी पाटील, श्रीपती माने, डी. डी. कदम, शिवाजी साळुंखे, संभाजी चाळके यांच्यासह हजारो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

‘द्रुष्ट प्रवृत्ती नष्ट करा’ म्हणत पेटवली होळी
देशभर होळीचा सण उत्साहात साजरा होत असताना ज्यांच्या त्यागाने शहर व गावे उजळून निघाली त्या प्रकल्पग्रस्तांना मात्र हा सण आंदोलनस्थळी साजरा करावा लागला. त्यांची होळी कोयनामाईच्या काठावर भाकरीच्या शोधासाठी व फाटलेला संसार जोडण्यासाठी साजरी झाली. धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्त यांच्या जीवनात अंधकार, दु:ख, दारिद्र्य निर्माण करणाºया द्रुष्ट प्रवृत्ती या होळीत जाळून नष्ट करा, अशा आशयाची मागणी करत आंदोलनस्थळी होळी पेटवण्यात आली.

कोयनानगर, ता. पाटण येथे प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनस्थळीच होळी पेटवून शासनाच्या नावाने शिमगा केला.

Web Title:  'Shimga' under the name of government of Koyna project affected: Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.