शेणोली, कार्वेत शेतकरी शास्त्रज्ञ भेट उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:12 IST2021-02-21T05:12:07+5:302021-02-21T05:12:07+5:30

शेतकरी शास्त्रज्ञ भेटीवेळी कडेगाव कृषी महाविद्यालयातील सहाय्यक प्रा. विजय पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. हरभरा पिकावर येणाऱ्या मर ...

Shenoli, Carvet Farmer Scientist Visit Initiative | शेणोली, कार्वेत शेतकरी शास्त्रज्ञ भेट उपक्रम

शेणोली, कार्वेत शेतकरी शास्त्रज्ञ भेट उपक्रम

शेतकरी शास्त्रज्ञ भेटीवेळी कडेगाव कृषी महाविद्यालयातील सहाय्यक प्रा. विजय पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. हरभरा पिकावर येणाऱ्या मर व घाटे अळी या रोगाबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच घाटेअळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्याची उभारणी याबाबतचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना शेतावर दाखविण्यात आले. यावेळी सैदापूर मंडलचे मंडल कृषी अधिकारी विनय कदम यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक पंडित मोरे, कृषी सहाय्यक हेमंत धापते, विक्रम नलवडे, शेणोलीचे प्रगतशील शेतकरी सुनील शामराव कणसे, सागर रामराव कणसे, किसन कणसे, शंकर पाटील, संतोष कणसे, अंकुश कणसे, सुहास कणसे व कार्वे येथील शेतकरी महादेव पाटील, दीपक थोरात, पोपट हुलवान तसेच शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Shenoli, Carvet Farmer Scientist Visit Initiative