शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

पाणी वाटपातील अनुशेषाला पर्याय हवेत- शशिकांत शिंदे : कोयनेचं गोड पाणी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 23:42 IST

‘जिल्ह्यात मोठी धरणे उभी राहिली. मात्र, पाणी वापरातील अनुशेषाचा मुद्दा वारंवार पुढे येत असल्याने धरण उशाला अन् कोरड घशाला, अशी आपल्या सातारा जिल्ह्याची परिस्थिती. पाणी वाटपातील अनुशेषाला

ठळक मुद्देकोयनेच्या पाण्यातून दुष्काळ मिटलाच पाहिजे, जिल्ह्याचा ५० टक्के भाग तहानलेलाच

सागर गुजर ।सातारा : ‘जिल्ह्यात मोठी धरणे उभी राहिली. मात्र, पाणी वापरातील अनुशेषाचा मुद्दा वारंवार पुढे येत असल्याने धरण उशाला अन् कोरड घशाला, अशी आपल्या सातारा जिल्ह्याची परिस्थिती. पाणी वाटपातील अनुशेषाला पर्याय निर्माण व्हायलाच हवेत, तरच उपलब्ध पाण्याद्वारे दुष्काळी भाग संपूर्णत: ओलिताखाली आणता येईल,’ असे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

आमदार शिंदे म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धरणे झाली आहेत. या धरणांमध्ये पावसाळ्यात मुबलक पाणीसाठा होतो. मात्र, या सर्वच पाण्यावर जिल्ह्याचा अधिकार नाही, ही वस्तुस्थिती आहे. विदर्भ-मराठवाड्याचा अनुषेशाचा मुद्दा वारंवार पुढे येतो. त्यामुळे पाणी असून, जिल्ह्याला त्याचा वापर करता येत नाही. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, तर दुसऱ्या बाजूला पूर्वेकडे अत्यल्प पाऊस पडतो. कोरेगाव, खंडाळा, माण, खटाव, खंडाळा, फलटण या तालुक्यांत सरासरीइतकाही पाऊस होत नाही. तालुकानिहाय अनुशेषाचा विचार राज्याच्या धोरणात आला तर सर्वात जास्त अनुशेष कोरेगाव, खटाव, माण, खंडाळा या तालुक्यांमध्ये असू शकेल. यासाठी आता जिल्ह्यातील दुष्काळ मिटविण्यासाठी पाणी वापरायला परवानगी मिळणे आवश्यक आहे.’

जिल्ह्यात ज्या भागात धरणे उभारली गेली त्या भागात म्हणजे जावळी, पाटण, वाई, महाबळेश्वर या भागांतील सर्वच क्षेत्र बागायती झाले नाही. या भागात भातशेतीशिवाय स्थानिक शेतकºयांना पर्याय नाही. काही भागात तर टँकरने पाणीपुरवठा केला जातो, हे दुर्दैव असल्याचे मत आ. शिंदे यांनी व्यक्त केले. दरम्यान, सर्वच जिल्हा ओलिताखाली आणण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे, त्यासाठी सकारात्मक धोरण राबवावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या पाण्यापैकी ८३ टीएमसी पाणी वाटपाबाबत शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. अजून काही दिवस हा मुद्दा निर्णयाअभावी राहिला तर राज्याचं पाणी परत जाऊ शकतं, अशी भीतीही आ. शिंदे यांनी आपल्या मुलाखतीत व्यक्त केली. पूर्वीच्या वाटपाच्या धोरणानुसार सांगली, सोलापूरला पाणी देताना सातारा जिल्ह्याने मोठेपणा दाखविला आहे. जिल्ह्यातील ५० टक्के भागात दुष्काळ आहे. आता कोयनेचे वाढीव मिळणारे पाणी दुष्काळी भागाला वरदान ठरेल. हे पाणी जिल्ह्याच्या दुष्काळी भागालाच मिळाले पाहिजे. कोरेगावचा पूर्वभाग, खटाव, माण हा भाग उंचवट्यावर आहे. येथे पाणी उचलून द्यावे लागणार आहे.योजना बारमाही करण्याचे आवाहनजिल्ह्यातील वसना-वांगना, जिहे-कटापूर, उरमोडी यापैकी एकही योजना बारमाही नाही. केवळ चार महिनेच या योजनेतून पाणी उपलब्ध होऊ शकते. बाराही महिने पाणी मिळावे, यासाठी अभ्यासपूर्ण तोडगा निघायला पाहिजे, असे मतही आ. शिंदे यांनी व्यक्त केले.विधिमंडळात मुद्दा मांडणारअनुशेषाला पर्याय काढावे लागतील, तरच नव्याने उपलब्ध होणारे पाणी इतरत्र वापरता येईल. अनुशेषाला पर्याय काढण्यासाठी विधिमंडळात मुद्दा उपस्थित करणार असल्याचेही आ. शिंदे यांनी सांगितले.संपूर्ण सातारा जिल्हा ओलिताखाली आल्याशिवाय कोयनेचे पाणी इतरत्र जाऊ देणार नाही. सातारा जिल्ह्यातील याआधी मनाचा मोठेपणा दाखविला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये धरणे नाहीत, त्या जिल्ह्यांतील शेतीक्षेत्र मोठ्या प्रमाणावर ओलिताखाली आलेले आहे. आता आमच्या जिल्ह्याची तहान भागल्याशिवाय पाणी कुठेही जाऊ देणार नाही.- आमदार शशिकांत शिंदे