शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

माण तालुक्यात ‘शेखरभाऊचा जय’ हो!

By admin | Updated: August 6, 2015 22:24 IST

दहिवडीत सत्तांतर : अटीतटीच्या लढतीत छोट्या भावाची विजयी घोडदौड

म्हसवड : माण तालुक्यातील दहिवडी, मार्डी, कुकुडवाड ग्रामपंचायतींवर पंचायत समिती सदस्य शेखर गोरे गटाने वर्चस्व मिळविले असून, आमदार जयकुमार गोरे यांनी ताब्यातील ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. या निवडणुकीत प्रचारास कमी वेळ मिळूनही पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांचाच वरचष्मा राहिल्याचे निकालावरून दिसून आले.ग्रामपंचायत निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या. या निवडणुकीत पळसावडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ‘रासप’च्या पॅनेलमधून मायाक्का जिजाबा काळे यांनी आईचा पराभव केला. गोंदवले बुद्रुकमध्ये मधुकर कट्टे व सुरेश भोसले यांना समान मते पडल्याने त्याठिकाणी चिठ्ठी टाकून मधुकर कट्टे यांना विजयी घोषित केले. दहिवडीत अरुण पवार व बसवलिंग साखरे यांनाही समान मते पडली. त्यामध्ये बसवलिंग साखरे हे चिठ्ठीद्वारे विजयी झाले. सोकासन ग्रामपंचायतीत वसंत जाधव व हरिबा जाधव यांना समान मते पडली. त्यांच्यातही चिठ्ठी टाकून हरिबा जाधव यांना विजयी घोषित केले.माण तालुक्यातील पहिल्या टप्प्यात झालेल्या ५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीच्या झाल्या. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या दहिवडीत सत्तांतर होऊन आमदार गटाकडून सत्ता खेचून आणण्यात शेखर गोरे गटाला यश आले. आमदार गोरे गटाने गोंदवले बुद्रुक व गोंदवले खुर्द ग्रामपंचायतीत वर्चस्व कायम राखले आहे. मार्डीमध्ये सदाशिव पोळ यांनी नऊ विरुद्ध चार अशी सत्ता राहिली. गोंदवले बुद्रुकमध्ये बाळासाहेब माने यांनी आमदार गोरे यांच्या साथीने काठावरचे बहुमत मिळवून विजय मिळविला. राणंदमध्ये जयकुमार गोरे, अनिल देसाई विरुद्ध सदाशिव पोळ, शेखर गोरे अशी लढत झाली. त्याठिकाणी शेखर गोेरे यांचे पारडे जड ठरले. (प्रतिनिधी)पती-पत्नी विजयीकुकुडवाड ग्रामपंचायतीत पती संजय जाधव व पत्नी शोभा जाधव हे दोघे निवडून आले आहेत. संजय जाधव हे यापूर्वी सरपंच होते.गुंडगेंचे पुत्र पराभूतअ‍ॅड. भास्कराव गुंडगे यांचा मुलगा व सूनबाई या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला. तेथे विद्यमान सरपंच धनाजी जाधव यांची पत्नी विजयी झाल्या.आमदार जयकुमार गोरे गटाची सत्ता आलेली ग्रामपंचायत : गंगोती, बोडके, शेवटी, शंभूखेड, गोंदवले खुर्द, शिरवळी, गट्टेवाडी, ढाकणी, भाटकी, धामणी, तोंडले, जासी, वडजल, हिंगणी, मोही, जांभुळणी, पाणवन, वाकी, गोंदवले बुद्रुक.पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांच्या गटाच्या ताब्यातील ग्रामपंचायती : येळेवाडी, बोकडे, मोगराळे, भालवडी, वर-म्हसवड, पिंगळी खुर्द, घोटेवाडी, शिंदे खुर्द, काळचौंडी, पळसावडे, कुळकजाई, पुळकेवाडी, वडगाव, खडकी, घदाळे, श्रीपालवण, स्वरुपखानवाडी, खारखेल, पिंगळी बुद्रुक, शिंदी बुद्रुक, पर्यंती, मार्डी, कुकुडवाड, वळई, सोकावन, राणंद, दहिवडी. गाव पॅनेलकडे : हवालदार वाडी, टाकेवाडी, भांडवली.