शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 06:16 IST

एकतर्फी प्रेमातून एका १५ वर्षांच्या शाळकरी मुलीच्या गळ्याला तरुणाने चाकू लावला.

सातारा :  एकतर्फी प्रेमातून एका १५ वर्षांच्या शाळकरी मुलीच्या गळ्याला तरुणाने चाकू लावला. यात मुलीच्या बोटाला चाकू लागला, तर त्या तरुणाला पकडताना एका व्यक्तीच्या हाताला चाकू लागून तो जखमी झाला. सुमारे पंधरा मिनिटांच्या थरारक घटनेनंतर मुलीची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले.  सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता एक धक्कादायक घटना घडली. आर्यन चंद्रकांत वाघमळे (वय १८, रा.सातारा) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.करंजे परिसरातील एक शाळा सायंकाळी सुटल्यानंतर मुले-मुली शाळेतून बाहेर आली. याच वेळी शाळेच्या परिसरात दबा धरून बसलेल्या आरोपीने संबंधित मुलीचा हात धरला. त्यानंतर, सोबत असलेला चाकू त्याने मुलीच्या गळ्याला लावला. हा प्रकार पाहून इतर मुली आरडाओरडा करू लागल्या. मुलगी सुटका करण्यासाठी धडपत होती. या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. 

पकडल्यानंतर नागरिकांनी दिला चोपपोलिसांनी चारही बाजूंनी त्याला वेढले. समोरच्या बाजूने त्याला पोलिसांनी बोलण्यात गुंतवले. अचानक एका पोलिसाने पाठीमागून दबक्या पावलाने येऊन आरोपी मुलाला धरून जमिनीवर खाली पाडले. त्यानंतर, त्याला जमावाने चांगलाच चोप दिला. शाहुपुरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.  

मुलीचा जीव लागला होता टांगणीलापोलिसांनी आरोपी मुलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. ‘तुम्ही सगळे येथून जावा,’ असे तो सगळ्यांना म्हणत होता. मध्येच तो मुलीच्या गळ्याला चाकू लावायचा. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलगी बराच प्रयत्न करत होती; परंतु त्याने तिला घट्ट पकडल्यामुळे तिला काहीच करता येत नव्हते.

चल आपण पळून जाऊ...संबंधित तरुण आणि मुलगी काही महिन्यांपूर्वी एकाच परिसरात राहत होते. मात्र, संबंधित मुलीचे कुटुंबीय डिसेंबर महिन्यात दुसरीकडे राहण्यास गेले. त्यानंतर, तो तिला भेटण्यासाठी सतत त्रास देत होता. ‘चल आपण पळून जाऊ,’ असे तो तिला म्हणत होता. हा प्रकार पालकांच्या कानावर घालण्यात आला होता. त्यावेळी त्याला समजावून सांगण्यात आले, परंतु सोमवारी त्याने थेट चाकू घेऊन त्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचे समोर आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर