शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीतील सत्यनारायण पूजा वादात

By admin | Updated: August 20, 2015 21:39 IST

दाभोलकर स्मृतिदिनी रंगला सोहळा : राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता मूल्याचे अवमूल्यन--जिल्हा परिषदेतून

सागर गुजर- सातारा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांना पुढे नेत असताना प्राण अर्पण करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदान दिवसाचे औचित्य साधून सातारा शहरात धर्मनिरपेक्ष तरुणाई रस्त्यावर उतरली होती. शहरातून निषेधाच्या घोषणा दिल्या गेल्या; पण दुर्दैवाने त्यांच्याच स्मृतिदिनी जिल्हा परिषदेच्या इमारतीत सत्यनारायणाची पूजा घालून समतेचे मूल्य पायदळी तुडविले गेले. येथील जिल्हा परिषदेच्या इमारतीत गुरुवारी (दि. २० आॅगस्ट) श्रावण मासानिमित्त सत्यनारायण पूजा घालण्यात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्या उपस्थितीत हा सोहळा गुरुवारी दिवसभर सुरू राहिला. अनेकांनी गोड शिरा अन् दुधावर ताव मारला. त्याचे झाले असे, सातारा जिल्हा परिषद कर्मचारी आर्थिक सहाय्य संस्थेचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. यानिमित्त व श्रावण मासाचे औचित्य साधून गुरुवारी या संस्थेत सत्यनारायण पूजा घालण्यात आली. वास्तविक ही संस्था जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतीत सुरू आहे. शासकीय कार्यालयांमध्ये कुठल्याही भारतीय राज्यघटनेतील आदर्श मूल्यानुसार कोणत्याही एका धर्माचे महत्त्व वाढावे, या हेतूने शासकीय कार्यालयांमध्ये कार्यक्रम घेता येत नाही. किंबहुना त्यांच्यात एकी नांदावी, या हेतूने राजकीय पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वागणे अपेक्षित असते; पण या धर्मनिरपेक्षतेचा सिध्दांतच जिल्हा परिषदेत पायदळी तुडविण्यात आला. या पूजेला सभापती अमित कदम, मानसिंगराव माळवे, मोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजू कदम, महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, शशिकांत कांबळे, उद्धव राऊत, ईलाही मुलाणी, मनोरंजना सरगर यांनीही हजेरी लावली.शासकीय पातळ्यांवर सत्यनारायणविरोधी चळवळ जोम धरू लागली असताना पुरोगामी विचारांच्या साताऱ्यातच या चळवळीला खो बसला आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांचे मत जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. जिल्हाधिकारी मागविणार अहवालसाताऱ्यात यापूर्वीही जिल्हा परिषदेमध्ये सत्यनारायण पूजा घालण्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी चौकशी समिती नेमली होती. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून या सत्यनारायण पूजेची चौकशी करून अहवाल देण्याची लेखी नोटीस बजावली होती. दरम्यान, याच कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयातील सत्यनारायणाची तयारी रद्द करण्यात आली होती. या पूर्वीच्या घटनेला यानिमित्ताने उजाळा मिळाला असून, गुरुवारच्या प्रकाराबाबतही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी अहवाल मागविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.सत्यनारायण पूजा भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षता हे मूल्य आहे. शासकीय कार्यालय, दालनात पूजा अर्चा करण्यात येत नाही. धर्मनिरपेक्ष हाच कारभार असला पाहिजे. शासकीय परिपत्रकानुसार देव-देवतांची छायाचित्रे शासकीय कार्यालयांत लावता येत नाहीत. या परिपत्रकानुसार २४ ते २५ महापुरुषांसह राष्ट्रपतींचे छायाचित्र कार्यालयांमध्ये लावण्यात यावे, असे म्हटले आहे. - अरुण जावळे, वैचारिक चळवळीतील कार्यकर्तेभारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे, शासकीय कार्यालयांमध्ये कुठल्याही एका धर्माचे गोडवे गाणारे सोहळे आयोजित करता येत नाहीत. जिल्हा परिषदेत असे झाले असल्यास त्यांच्याकडून चौकशी अहवाल मागवून घेतो.- अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी