साताऱ्याचा पारा ४२ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 10:58 PM2019-04-28T22:58:21+5:302019-04-28T22:58:27+5:30

सातारा/कºहाड : उन्हानं रानं तापू लागलंय. एप्रिल अखेरीस पारा ४२.१ अंशांवर पोहोयलाय. त्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासूनच घामाच्या धारा लागतायत. ...

Saturn's mercury is 42 degrees | साताऱ्याचा पारा ४२ अंशांवर

साताऱ्याचा पारा ४२ अंशांवर

Next

सातारा/कºहाड : उन्हानं रानं तापू लागलंय. एप्रिल अखेरीस पारा ४२.१ अंशांवर पोहोयलाय. त्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासूनच घामाच्या धारा लागतायत. कडक उन्हाळा आणि वातावरणातील उष्णतेमुळे सध्या सर्वजण हैराण झालेत. सावली आणि गारवा मिळविण्यासाठी जो तो धडपडताना दिसतोय.
एप्रिल महिन्याच्या अखेरीस सध्या कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचा पारा वाढायला सुरुवात होते. भरदुपारी रस्त्यावर येताच घामाच्या धारा सुरू होतात. सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत कडक ऊन जाणवते. या कालावधीत रस्तेही ओस पडत असल्याचे सध्या दिसून येत आहे. दुपारच्या सुमारास दुचाकीवरून प्रवास करणारे हेल्मेट घालून अथवा डोक्यावर रुमाल टाकूनच मार्गस्थ होतायत. तसेच कडक उन्हात गारवा मिळावा, यासाठी सरबत तसेच ज्यूसच्या गाड्यावर गर्दी होताना दिसते.
बाजारपेठेमध्ये सध्या विविध प्रकारच्या सरबतांबरोबर लिंंबू, कोकम, उसाचा रस, ताक, लस्सी, नारळ पाणी, ताज्या फळांचा रस यासारखे थंडगार पेय उपलब्ध झाली आहेत. याशिवाय नारळ पाणी, कलिंगडांच्या फोडींनाही मोठी मागणी असल्याचे दिसते.
सध्या चैत्र महिना सुरू आहे. वैशाख सुरू व्हायला आणखी काही दिवस बाकी आहेत. मात्र, तरीही आत्ताच अंगाची लाहीलाही होतेय. उष्णतेचाही सर्वांना खूप त्रास होतोय. घराबाहेर पडणे आणि फिरणेही सध्या अवघड झाले आहे.

उन्हाळ्यात हे करावे
भरदुपारी घराबाहेर पडणे टाळावे.
बाहेर जाताना रुमाल, टोपीचा वापर करावा.
भरपूर पाणी प्यावे.
माठातील पाण्याचा वापर करावा.
थंडपेयांचे अतिसेवन टाळावे.
आरोग्यदायी पदार्थांचे पर्याय निवडावेत.
उत्तम दर्जाचा फळांचा रस घ्यावा.
उन्हाळ्यातील आहार अन् जलपान
लिंबू सरबत, कोकम सरबत, लस्सी, नाचणीचे आंबील, वाळ्याचे सरबत, काकडीचा रस, थंड ताक किंवा थंड केलेला कलिंगड, टरबुजाच्या फोडी अथवा ज्यूस घ्यावे. तसेच जेवणात घन आहारापेक्षा सूप किंवा तत्सम पातळ पदार्थांवर भर द्यावा. उन्हाळ्याच्या दिवसांत जड व मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. लोणचे, पापड, शिळे अन्न घेऊ नये.

Web Title: Saturn's mercury is 42 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.