शिष्यवृत्ती परीक्षेत सातारी झेंडा!

By Admin | Updated: July 25, 2014 22:17 IST2014-07-25T20:59:35+5:302014-07-25T22:17:24+5:30

वृषाली राज्यात दुसरी : ग्रामीण शाळेच्या विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Saturna flag of scholarship exam! | शिष्यवृत्ती परीक्षेत सातारी झेंडा!

शिष्यवृत्ती परीक्षेत सातारी झेंडा!

सातारा : पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृती शिष्यवृत्ती परीक्षेत सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतही उत्कृष्ट शिक्षण दिले जाते, हे या निकालांवरून सिद्ध झाले आहे.
माध्यमिकमध्ये शहरी विभागात कऱ्हाडच्या नगरपालिका शाळेतील वैष्णवी थोरात हिने राज्यात सातवा तर ग्रामीण विभागात वाघेश्वरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हर्षल गजानन चेणगे याने राज्यात चौथा येण्याचा मान मिळविला.
सातारा जिल्ह्यातील एकूण २५ विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. माध्यमिकमध्ये शहरी भागातून अनंत इंग्लिश स्कूलच्या वृषाली तिखे व पाटणच्या ऋषिकेश मोहिते याने राज्यात अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेले सर्वच विद्यार्थी हे जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी आहेत. या शाळांतील दर्जा याविषयी वारंवार उलट-सुलट चर्चा होते.
मात्र, विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे या शाळांमधील गुणवत्ता आणि शिक्षणपद्धती उत्कृष्टच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या परीक्षेमध्ये जिल्हा परिषद शाळेसह नगरपालिका शाळांनीही देदीप्यमान कामगिरी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Saturna flag of scholarship exam!