शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP Election 2026: कराड तालुक्यात भाजप-राष्ट्रवादीतच मुख्य लढत !, काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 19:57 IST

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; यश मिळणार कोणाला ?

प्रमोद सुकरेकराड : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कराड तालुक्यातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे. अर्ज दाखल करणे, छाननी या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. आतापर्यंतची सगळी परिस्थिती पाहता तालुक्यात भाजप विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस अशीच मुख्य लढत होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथे नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या आता यश मिळणार कोणाला? हे पाहावे लागणार आहे.दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कराड तालुक्याला मोठी राजकीय परंपरा आहे. येथील पंचायत समिती सभापतीपद अनेक मातब्बरांनी भूषवलेले आहे. त्यामुळे येथील सभापतीपदाला अनन्य साधारण असे महत्त्व राहिले आहे. त्यामुळे पंचायत समितीसह जिल्हा परिषद निवडणुकीत सध्या भलतीच रंगत वाढली आहे.

कराड तालुक्याच्या राजकारणात आजवर काँग्रेस विचाराचा प्रभाव राहिला आहे. मात्र, गत विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण व उत्तर अशा दोन्ही विधानसभा मतदारसंघांत भाजपने परिवर्तनाचे ‘कमळ’ फुलवले आहे. त्यामुळे आता पंचायत समितीवरही भाजपचा झेंडा फडकवण्याचा व जिल्हा परिषदमध्ये सत्ता आणण्यासाठी मोठा वाटा उचलण्याचे नियोजन दोन्ही आमदारांनी चालवले आहे. भाजपचा हा वारू थोपवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रित येत चांगले आव्हान उभे केले आहे. त्याला इतर पक्षांचीही साथ मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यास किती व कसे यश येईल हे नजीकच्या काळात समजेलच.

काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष !काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या कराड नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह १३ ठिकाणी काँग्रेसचे स्वबळावर उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांच्या ‘हाता’ला त्यावेळी काहीच लागलेले नाही. त्यामुळे होऊ घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसची नेमकी भूमिका काय राहणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. अर्ज माघारी नंतरच याबाबतची स्पष्टता येणार आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपदावर डोळासातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. कराड तालुक्यातील काले व विंग या दोन्ही गटांत ओबीसी महिला आरक्षण पडले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही जिल्हा परिषद गट कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात येतात. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार डॉ. अतुल भोसले यांनी या दोन्ही मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.कराड तालुक्यात काही ठिकाणी शिंदेसेनेने उमेदवारी अर्ज भरले आहेत. तर, काही ठिकाणी त्यांनी एबी फार्म दिलेले नाहीत. या निवडणुकीत नेमकी त्यांची पडद्यामागून काय भूमिका राहणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara ZP Election 2026: BJP-NCP face-off in Karad, Congress's role crucial.

Web Summary : Karad witnesses a BJP versus NCP battle for the Satara ZP election. All eyes are on the Congress party's strategy. The ZP president post is reserved for an OBC woman, making the election even more interesting.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Satara areaसातारा परिसरKaradकराडBalasaheb Patilबाळासाहेब पाटीलAtul Bhosaleअतुल भोसलेPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपा