Satara ZP Election 2026: कराड उत्तरसह खटाव काँग्रेसचे अध्यक्ष निलंबित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:32 IST2026-02-03T19:31:12+5:302026-02-03T19:32:50+5:30

काँग्रेसच्या उमेदवाराविरोधी प्रचार

Satara ZP Election 2026 Karad North and Khatav Congress President suspended | Satara ZP Election 2026: कराड उत्तरसह खटाव काँग्रेसचे अध्यक्ष निलंबित 

संग्रहित छाया

सातारा : कराड उत्तर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास थोरात यांनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. तसेच खटाव ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या पक्षविरोधी कारवायांची दखल घेऊन त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केले आहे, अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कराड उत्तर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास थोरात हे भाजप व अपक्षांचा प्रचार करीत असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा काँग्रेसकडे दिला आहे. संबंधित राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. थोरात यांना पदमुक्त केले आहे. काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थोरात यांचे कोणतेही आदेश विचारात घेऊ नयेत. आता त्यांचा काँग्रेस पक्षाशी काहीही संबंध राहिलेला नाही.

खटाव ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांना कातरखटाव जिल्हा परिषद मतदार संघात पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. परंतु त्यांनी निवडणुकीतून माघार घेऊन विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. सदाशिव खाडे हे काँग्रेसच्या उमेदवाराविरोधी प्रचार करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित तक्रारीची शहानिशा केली असता, त्यात तथ्य आढळल्याने सदाशिव खाडे यांना पदावरून हटवले असून, त्यांना काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. खटाव ब्लॉक काँग्रेसच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदी प्रभारी अध्यक्ष म्हणून परेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Web Title : सतारा कांग्रेस: 2026 चुनाव से पहले पार्टी विरोधी गतिविधियों के लिए नेता निलंबित

Web Summary : सतारा कांग्रेस ने कराड उत्तर ब्लॉक अध्यक्ष श्रीनिवास थोरात (इस्तीफा, भाजपा समर्थक) और खटाव ब्लॉक अध्यक्ष सदाशिव खाडे (पार्टी उम्मीदवार के खिलाफ प्रचार) को निलंबित किया। परेश जाधव खटाव के कार्यवाहक अध्यक्ष नियुक्त।

Web Title : Satara Congress Leaders Suspended for Anti-Party Activities Before 2026 Election

Web Summary : Satara Congress suspends Karad North block president Shrinivas Thorat (resigned, supporting BJP) and Khatao block president Sadashiv Khade (campaigning against party candidate). Paresh Jadhav appointed acting Khatao president.