सातारा:  टेम्पोच्या धडकेत युवक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 15:23 IST2018-12-28T15:22:20+5:302018-12-28T15:23:12+5:30

सातारा येथील वाढे फाट्याजवळ दुचाकीवरून जात असताना समोरून चुकीच्या बाजूने आलेल्या टेम्पोने धडक दिल्याने युवक जखमी झाला. हा अपघात गुरुवारी रात्री अकरा वाजता झाला.

Satara: The youth were injured in a tempo shock | सातारा:  टेम्पोच्या धडकेत युवक जखमी

सातारा:  टेम्पोच्या धडकेत युवक जखमी

ठळक मुद्देटेम्पोच्या धडकेत युवक जखमीसातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा: येथील वाढे फाट्याजवळ दुचाकीवरून जात असताना समोरून चुकीच्या बाजूने आलेल्या टेम्पोने धडक दिल्याने युवक जखमी झाला. हा अपघात गुरुवारी रात्री अकरा वाजता झाला.

महेश विठ्ठल गोरे (वय २७, रा. कटगुण, ता. खटाव) असे जखमी युवकाचे नाव आहे. महेश गोरे हा वेण्णा पुलाजवळील डाव्या बाजूने दुचाकीवरून जात होता. यावेळी समोरून आलेल्या टेम्पो चालक भिकू काशिनाथ गालफाडे (रा. प्रतापसिंहनगर, सातारा) याने धडक दिली.

या अपघातात महेशे गोरे जखमी झाला. याप्रकरणी टेम्पो चालक भिकू गालफाडे याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Satara: The youth were injured in a tempo shock