शहरं
Join us  
Trending Stories
1
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
2
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
3
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
4
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
6
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
7
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
8
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
9
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
10
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
11
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
12
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
13
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
14
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
15
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
16
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
17
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
18
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
19
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
20
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल

सातारा : कडेगाव-वांगीच्या अपघातात कऱ्हाडने गमावले दोन मल्ल, कुस्ती क्षेत्रावर शोककळा, तालुक्यात हळहळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:30 PM

कुस्ती आणि कऱ्हाडचं जवळचं नातं; पण आज या कुस्तीक्षेत्राला अनपेक्षित धक्का बसला. कडेगाव-वांगी येथे झालेल्या अपघातात कऱ्हाड तालुक्यातील दोन मल्लांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुस्तीत तालुक्यासह जिल्ह्याला नावलौकिक मिळवून देण्यासाठी मातीत खेळणारे दोन तरुण हकनाक गेले. त्यामुळे कुस्ती क्षेत्रासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे कडेगाव-वांगीच्या अपघातात कऱ्हाडने गमावले दोन मल्लमातीत खेळणारे दोन तरुण हकनाक गेलेकुस्ती क्षेत्रावर शोककळा, तालुक्यात हळहळ

कऱ्हाड  : कुस्ती आणि कऱ्हाडचं जवळचं नातं; पण आज या कुस्तीक्षेत्राला अनपेक्षित धक्का बसला. कडेगाव-वांगी येथे झालेल्या अपघातात कऱ्हाड तालुक्यातील दोन मल्लांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुस्तीत तालुक्यासह जिल्ह्याला नावलौकिक मिळवून देण्यासाठी मातीत खेळणारे दोन तरुण हकनाक गेले. त्यामुळे कुस्ती क्षेत्रासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

कऱ्हाड तालुक्यातील काले येथील आकाश देसाई आणि मालखेड येथील सौरभ माने या दोन युवा मल्लांचा वांगी येथील अपघातात मृत्यू झाला. काले येथील आकाश याची शरीरयष्टी भारदस्त होती.

त्यामुळे साहजिकच कुस्ती क्षेत्रात त्याला मानाचे स्थान मिळाले होते. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील दादासाहेब देसाई हे वडिलोपर्जित शेती करतात. तर गत काही महिन्यांपासून त्यांनी भाजीपाल्याचा व्यापार सुरू केला आहे.

शेती आणि व्यापारातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी बहुतांश पैसे ते आकाशसाठी खर्च करायचे. त्याचा सराव, खुराक आणि स्पर्धा यासाठी ते रात्रंदिवस कष्ट करायचे. आपल्या मुलाने कुस्तीत खूप मोठे यश मिळवावे, असे कुटुंबीयांचे स्वप्न होते.

आकाशलाही परिस्थितीची जाणीव होती. साडेसहा फूट उंच आकाश मनमिळावू आणि शांत स्वभावाचा होता. तो कुस्तीत खूप मोठे यश मिळवेल, अशी कुस्तीतज्ज्ञांनाही खात्री होती. मात्र नियतीने होत्याचे नव्हते केले.

आकाशचा अनपेक्षित मृत्यू झाला. आणि काले गावासह कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली. मालखेड येथील सौरभ माने याचाही या अपघातात मृत्यू झाला असून, नामवंत मल्ल अशी त्याची परिसरात ओळख होती.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातSangliसांगलीSportsक्रीडा