मल्हारपेठ (सातारा) : पाटण तालुक्यातील उरुल घाटात बुधवारी (25 एप्रिल) पहाटेच्या सुमारास मळीने भरलेला ट्रक संरक्षक कठडा तोडून थेट 70 फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर क्लिनर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मल्हारपेठपासून दोन किलोमीटर अंतरावर उम्ब्रज पाटण मार्गावर उरुल घाट आहे. बुधवारी पहाटे मळीने भरलेला ट्रक चिपळूणहून उम्ब्रजच्या दिशेनं प्रवास करत होता. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ट्रक उरुल घाटात आला. यावेळी घाटातील एका वाहनावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक संरक्षक कठडा तोडून थेट 70 फूट खोल दरीत जाऊन कोसळला. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर क्लिनर गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या अपघातानंतर घटनास्थळी वाहनधारकांची गर्दी झाली होती.
सातारा : उरुल घाटातील दरीत कोसळला ट्रक, चालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 09:44 IST