शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

सातारा :कठडा तोडून वाळूचा ट्रक नदीपात्रात, दहिवडीजवळ अपघात; गायब चालकाचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 2:10 PM

वाळू वाहतूक करणारा ट्रक गुरुवारी मध्यरात्री दहिवडी शेजारील पुलावरून माणगंगा नदीपात्रात कोसळला. अपघातानंतर ट्रकचालक गायब झाला असून, मालकही अद्याप तेथे आला नाही. त्यामुळे दहिवडी पोलीसही चक्रावले आहेत.

ठळक मुद्देसातारा :कठडा तोडून वाळूचा ट्रक नदीपात्रात दहिवडीजवळ अपघात; गायब चालकाचा शोध सुरू

दहिवडी (सातारा) : वाळू वाहतूक करणारा ट्रक गुरुवारी मध्यरात्री दहिवडी शेजारील पुलावरून माणगंगा नदीपात्रात कोसळला. अपघातानंतर ट्रकचालक गायब झाला असून, मालकही अद्याप तेथे आला नाही. त्यामुळे दहिवडी पोलीसही चक्रावले आहेत.याबाबत माहिती अशी की, फलटणकडून दहिवडीकडे येणारा वाळूचा ट्रक गुरुवारी मध्यरात्री उलटला. एमएच ४५-१६७१ असा गाडी नंबर असून, या गाडीचा चालक गायब आहे. या पुलावर सहा महिन्यांपूर्वी एसटी कोसळली होती. त्याच पुलावरून पुन्हा कठडे तोडून ट्रक पडला.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दहिवडीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातग्रस्त गाडी मालकाचा शोध सुरू असून, वाळू उपसा बंद असतानाही वाळू वाहतूक नेमकी कुठे चालली होती, हा प्रश्न निर्माण झाला आहे.ट्रक उलटल्याने चालक गंभीर जखमी झाला असल्याची शक्यता असून, तो कोणत्या रुग्णालयात उपचार घेत आहे, याचाही पोलीस शोध घेत आहेत. मात्र परिसरातील आणि शहरातील मोठ्या रुग्णालयात कोणीही आलेला नाही.वारंवार अपघात घडत असल्याने पुलाची रुंदी वाढविण्याबाबत वाहनचालकांमधून वारंवार मागणी केली जात आहे. संबंधित विभाग मात्र तात्पुरती डागडुजी करून वेळ मारून नेत आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात