सातारा :खटावचा शोएब मुल्ला बनला चांदीच्या गदाचा मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 04:50 PM2018-04-03T16:50:04+5:302018-04-03T16:54:03+5:30

खटावमधील मल्ल शोएब मुल्ला याने दरूज येथे भरविण्यात आलेल्या कुस्तीच्या मैदानात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती जिंकून चांदीची गदा पटकावली.

Satara: Shoaib Mullah became the jewel of the silver maid | सातारा :खटावचा शोएब मुल्ला बनला चांदीच्या गदाचा मानकरी

सातारा :खटावचा शोएब मुल्ला बनला चांदीच्या गदाचा मानकरी

googlenewsNext
ठळक मुद्देखटावचा शोएब मुल्ला बनला चांदीच्या गदाचा मानकरीदरूजला कुस्ती मैदान : दुसऱ्या क्रमांकासाठीचे २५ हजारांचे बक्षीसही पटकावले

खटाव (सातारा) : खटावमधील मल्ल शोएब मुल्ला याने दरूज येथे भरविण्यात आलेल्या कुस्तीच्या मैदानात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती जिंकून चांदीची गदा पटकावली.

सातारा जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात ग्रामीण भागात ग्रामदैवतांच्या यात्रांचा हंगाम सुरू होतो. यात्रामध्ये कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे सर्वांना खास आकर्षण असते. यामध्ये नामवंत मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्या पाहावयास मिळतात.

दरूज येथे ग्रामदेवतेच्या यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या कुस्ती मैदानात खटावचा युवा मल्ल शोएब मुल्ला याने खुल्या गटामध्ये भूषण सूर्यवंशी याच्याशी अटीतटीची लढत देत चीतपट डावाने कुस्ती जिंकून मानाची चांदीची गदा तर जिंकलीच त्याचबरोबर २५ हजार रुपयांचे बक्षीसही पटकावले.

सर्वसामान्य कुटुंबातील शोएबची कुस्तीकडील ओढा व त्याची आवड पाहून त्याला या क्षेत्रात प्रवीण होण्याकरिता त्यांनी प्रोत्साहन दिले. त्याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खटावमध्ये पूर्ण केले असून, उच्च माध्यमिक शिक्षण तो खटावमधील शहाजीराजे महाविद्यालयात घेत आहे.

Web Title: Satara: Shoaib Mullah became the jewel of the silver maid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.