सातारा : खासगी प्रवासी बस घुसली ऊसाच्या ट्रॉलीत; ३२ प्रवासी किरकोळ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 14:00 IST2018-01-30T13:55:57+5:302018-01-30T14:00:51+5:30
पहाटेच्या अंधारात उलट्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात खासगी प्रवासी बस ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीत घुसली. यामुळे झालेल्या अपघातात ३२ प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करुन सोडून देण्यात आले.

सातारा : खासगी प्रवासी बस घुसली ऊसाच्या ट्रॉलीत; ३२ प्रवासी किरकोळ जखमी
ठळक मुद्देअपघातात ३२ प्रवासी किरकोळ जखमी ट्रक्टरसह वाहनांचे पाच लाखांहून अधिक रूपयांचे नुकसान कऱ्हाड-कोल्हापूर लेन सहा तास बंद
मलकापूर (सातारा) : पहाटेच्या अंधारात उलट्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात खासगी प्रवासी बस ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीत घुसली.
यामुळे झालेल्या अपघातात ३२ प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करुन सोडून देण्यात आले.
या अपघात ट्रक्टरसह वाहनांचे पाच लाखांहून अधिक रूपयांचे नुकसान झाले. हा अपघात पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर हद्दीत पहाटे झाला.
कऱ्हाड-कोल्हापूर लेन सहा तास बंद होती. वाहतूक उपमार्गावरून वळवण्यात आली होती.