कऱ्हाड येथे डंपरखाली सापडून युवती ठार

By admin | Published: December 23, 2016 11:39 PM2016-12-23T23:39:51+5:302016-12-23T23:39:51+5:30

मैत्रीण गंभीर जखमी : सिग्नल ओलांडताना दुचाकी घसरून अपघात

The assailant was beaten down by a scorpion in Karhad | कऱ्हाड येथे डंपरखाली सापडून युवती ठार

कऱ्हाड येथे डंपरखाली सापडून युवती ठार

Next


कऱ्हाड : सिग्नल ओलांडण्याच्या गडबडीत डंपरच्या टायरखाली सापडून दुचाकीस्वार युवती जागीच ठार झाली, तर तिची मैत्रीण गंभीर जखमी झाली. कऱ्हाड शहरातील पोपटभाई पेट्रोल पंप चौकात शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास ही घटना घडली. ध्रुवी नितीन शहा (वय १९, रा. मंगळवार पेठ, कऱ्हाड) असे मृत युवतीचे नाव आहे, तर गंभीर जखमी झालेल्या ईशा श्रीपाल ओसवाल (वय १८, रा. रुक्मिणी इस्टेट, प्रकाशनगर, कऱ्हाड) हिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पोपटभाई पेट्रोल पंप चौकात शुक्रवारी सायंकाळी सिग्नल यंत्रणा सुरू होती. वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यात व्यस्त होते. त्याचवेळी सुपर मार्केटकडून आलेला डंपर (एमएच ११ एएल ४४८८) पोपटभाई पेट्रोल पंप चौकातून कोल्हापूर नाक्याच्या दिशेने निघाला होता. संबंधित डंपरपाठोपाठ धु्रवी शहा व ईशा ओसवाल या मैत्रिणी दुचाकीवरून निघाल्या होत्या. चौकात डंपर वळत असताना या दोघींनी डंपरला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक दुचाकी घसरल्याने दोघीही खाली कोसळल्या. ईशा डाव्या बाजूस तर ध्रुवी उजव्या बाजूस पडली. त्यावेळी डंपरचा टायर डोक्यावरून गेल्याने ध्रुवीचा जागीच मृत्यू झाला.
अपघात निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी व पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेऊन जखमी ईशाला रुग्णालयात हलविले. ईशा व ध्रुवी क्लाससाठी कोल्हापूर नाक्यावर निघाल्या होत्या, अशी चर्चा घटनास्थळी
होती. अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसांत झाली नव्हती. (प्रतिनिधी)

Web Title: The assailant was beaten down by a scorpion in Karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.