सातारा : महावितरणच्या दरवाढीचा वीजग्राहकांना झटका, वीज वापर एकपट तर बिल दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 16:28 IST2018-12-12T16:26:50+5:302018-12-12T16:28:35+5:30
सध्या वीज वापर ही घराघरातील आवश्यक गरज बनली आहे. एका बाजूला गरज तर दुसऱ्या बाजूला विजेच्या वाढत्या बिलामुळे ही गरजच आज सर्वसामान्यांची डोकेदुखी बनली आहे.

सातारा : महावितरणच्या दरवाढीचा वीजग्राहकांना झटका, वीज वापर एकपट तर बिल दुप्पट
ठळक मुद्देमहावितरणच्या दरवाढीचा वीजग्राहकांना झटका, वीज वापर एकपट तर बिल दुप्पट : स्थिरसह इतर आकारांचा चढता आलेख; ग्राहकांच्या खिशाला कात्री
मलकापूर : सध्या वीज वापर ही घराघरातील आवश्यक गरज बनली आहे. एका बाजूला गरज तर दुसऱ्या बाजूला विजेच्या वाढत्या बिलामुळे ही गरजच आज सर्वसामान्यांची डोकेदुखी बनली आहे.
प्रती युनिट वीजदराने होणाऱ्या वापराचे बिल एकपट व वाढलेल्या स्थिर आकारासह इतर आकाराच्या वाढीव टक्केवारीमुळे तेच बिल दुप्पट होत आहे. त्यामुळे वीज वापर एकपट तर बिल दुप्पट झाल्याने ग्राहकांना महावितरणचा चांगलाच झटका बसत आहे.
स्थिर आकाराचा चढता आलेख
मार्च २०१७ - ५५ रुपये
एप्रिल २०१७ - ५९ रुपये
मे २०१७ - ६० रुपये
एप्रिल २०१८ - ६२ रुपये
मे २०१८ - ६५ रुपये
आॅक्टोबर २०१८ - ८० रुपये