हातात तलवार घेऊन माजवली दहशत, साताऱ्यात दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 14:54 IST2019-03-31T14:54:03+5:302019-03-31T14:54:46+5:30
दुचाकीवर बसून हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे

हातात तलवार घेऊन माजवली दहशत, साताऱ्यात दोघांना अटक
सातारा: दुचाकीवर बसून हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे. अक्षय उर्फ स्वप्निल सुरेश भोसले (वय २८, रा. गणेश कॉलनी तामजाईनगर सातारा), अक्षय महादेव धनवडे (वय २४, रा. आझाद नगर मोळाचा ओढा शाहूपुरी सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
तामजाईनगर येथील रुद्राक्ष रेसीडेन्सी अपार्टमेंट समोरील दुकानाजवळ हे दोघे शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास दुचाकीवर बसले होते. यावेळी त्यांच्या हातात तलवार होती. हा प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ तेथे धाव घेऊन अक्षय भोसले आणि अक्षय धनवडेला अटक केली. त्यानंतर त्यांना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शाहूपुरी पोलीस ठाण्यात या दोघांवर बेकायदेशीर तलवार बाळगून दहशत माजवल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात या दोघांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.