मार्गशीर्षच्या दुसऱ्या गुरुवारसाठी सातारा बाजारपेठ सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 03:58 PM2017-11-29T15:58:21+5:302017-11-29T16:04:18+5:30

मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारसाठी सातारा बाजारपेठ सज्ज झाली आहे. बुधवारी सकाळपासूनच पूजेसाठी आवश्यक असणारी फळे आणि फुले विक्रीसाठी शहराच्या मुख्य चौकात पाहायला मिळाली. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महिला पूजा मांडून देवीची आराधना करतात. घरात धनधान्य आणि सुख समृध्दीसाठी ही पूजा केली जाते.

Satara market ready for the second day of the route | मार्गशीर्षच्या दुसऱ्या गुरुवारसाठी सातारा बाजारपेठ सज्ज

मार्गशीर्षच्या दुसऱ्या गुरुवारसाठी सातारा बाजारपेठ सज्ज

Next
ठळक मुद्देपाच फळे बाजारात तीस रुपयांपर्यंत, एक प्लेट फुलांचा दहा रुपये दर बाजारपेठेत फळे आणि फुले खरेदीसाठी महिलांची लगबग

सातारा : मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. बुधवारी सकाळपासूनच पूजेसाठी आवश्यक असणारी फळे आणि फुले विक्रीसाठी शहराच्या मुख्य चौकात पाहायला मिळाली.


मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महिला पूजा मांडून देवीची आराधना करतात. घरात धनधान्य आणि सुख समृध्दीसाठी ही पूजा केली जाते. या पूजेसाठी आवश्यक असणारी पाच फळे बाजारात तीस रुपयांपर्यंत मिळत आहेत. तर दहा रुपये एक प्लेट फुलांचा दर आहे.

गेल्या काही महिन्यांत फळांचे दर गगनाला भिडले होते. मार्गशीर्ष महिन्याच्या प्रारंभीच दरांची भरारी वाढल्याने सामान्यांना परवडतील या बेताने तीस रुपयांत फळे मिळत असल्यामुळे समाधानाचे वातावरण आहे. बुधवारी सकाळपासूनच बाजारपेठेत फळे आणि फुले खरेदीसाठी महिलांची लगबग दिसत होती.

Web Title: Satara market ready for the second day of the route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.