Satara: माहुलीचे युवा नेते संतोष जाधव यांच्यावर कोयत्याने वार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 22:49 IST2023-06-06T22:49:39+5:302023-06-06T22:49:53+5:30

Satara News: संगम माहुली, ता. सातारा येथील युवा नेते संतोष भाऊ जाधव यांच्यावर दोघा जणांनी कोयत्याने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास माहुली येथे घडली.

Satara: Mahuli youth leader Santosh Jadhav stabbed with a spear | Satara: माहुलीचे युवा नेते संतोष जाधव यांच्यावर कोयत्याने वार  

Satara: माहुलीचे युवा नेते संतोष जाधव यांच्यावर कोयत्याने वार  

सातारा  - संगम माहुली, ता. सातारा येथील युवा नेते संतोष भाऊ जाधव यांच्यावर दोघा जणांनी कोयत्याने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास माहुली येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संतोष जाधव यांची दोघेजण पूर्वीच्या वादातून माफी मागायला म्हणून आले. यानंतर त्यांनी कोयत्याने त्यांच्यावर वार केले. यामध्ये त्यांच्या डोक्याला जखम झाली. काही नागरिकांनी जाधव यांना तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी तातडीने दखल घेऊन संशयितांना पकडण्याचे पोलिसांना आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी माहुली परिसरातून काही मिनिटांतच दोघांना ताब्यात घेतले. पोलिस त्यांच्याकडे कसून चाैकशी करत आहेत. सातारा शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.

Web Title: Satara: Mahuli youth leader Santosh Jadhav stabbed with a spear