सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या वृत्ताने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच, साताऱ्यातही मोठी शोककळा पसरली. समाजमाध्यमांवर ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच सातारकरांच्या पायाखालची जमीन सरकली आणि जिल्ह्याचे समाजमन हेलावून गेले.सातारा शहरासह जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांमधील दुकानदारांनी आपली दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांना अजित पवारांची ही अचानक झालेली एक्झिट चटका लावून गेली. शहरात ठिकठिकाणी श्रद्धांजलीचे फलक झळकले असून सातारकरांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सातारा जिल्ह्याने आज केवळ एक नेताच नाही, तर आपल्या हक्काचा मार्गदर्शक गमावला असल्याची भावना तमाम सातारकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली.
Ajit Pawar Death News Live: फडणवीस, शिंदे राज्यपालांसह बारामतीत पोहोचले, थेट रुग्णालयाकडे रवाना
राजकारणापलीकडची मैत्री हरपली : शंभूराज देसाईपालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, स्पष्टवक्ता आणि नियमात बसणाऱ्या गोष्टी करणारा नेता अशी दादांची ओळख होती. मी अडीच वर्षे वित्त विभागात त्यांच्यासोबत राज्यमंत्री म्हणून काम करताना पाहिले की, अर्थसंकल्प सादर करताना प्रत्येक घटकाला न्याय मिळावा हीच त्यांची भूमिका असायची. आमची राजकारणापलीकडची मैत्री होती. या घटनेवर विश्वासच बसत नाहीये, हा मनाला मोठा धक्का आहे.
धाडसी नेतृत्व काळाने हिरावले : उदयनराजे भोसलेखासदार उदयनराजे भोसले यांनीही या घटनेने मन विषण्ण झाल्याचे सांगितले. अजितदादांची एक्झिट प्रचंड मानसिक धक्का देणारी आहे. बोलायला शब्द उरले नाहीत. वास्तवाचे भान ठेवून बेधडक निर्णय घेणारे नेतृत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे. त्यांच्या स्वभावामुळे ते समाजमनात कायमचे अजरामर राहतील, अशा शब्दांत उदयनराजेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Web Summary : Satara deeply saddened by Ajit Pawar's tragic death in a plane accident. Businesses closed as a mark of respect. Leaders express shock, remembering Pawar's impactful leadership and contributions to Maharashtra. Udayanraje said he will remain immortal.
Web Summary : अजित पवार की विमान दुर्घटना में दुखद मौत से सतारा में शोक की लहर। कारोबार बंद, श्रद्धांजलि अर्पित। नेताओं ने पवार के नेतृत्व और महाराष्ट्र में योगदान को याद किया। उदयनराजे ने कहा, वे हमेशा अमर रहेंगे।