शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
2
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
3
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
4
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
5
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
6
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
7
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
8
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
9
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
10
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
11
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
12
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
13
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
14
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
15
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
16
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
17
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
18
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
19
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
20
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 

निवडणुकीच्या रणधुमाळीत सातारा राज्याच्या केंद्रस्थानी!; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

By सचिन काकडे | Updated: October 17, 2025 17:50 IST

शशिकांत शिंदे यांचीही मोर्चेबांधणी

सचिन काकडेसातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे आता वेगाने वाहू लागले असून, सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या रणधुमाळीत पुन्हा एकदा सातारा जिल्हा राज्याच्या ‘केंद्रस्थानी’ आला आहे. राज्याच्या सर्वोच्च पदावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिल्ह्यातील चारही मंत्र्यांनी या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित आहे. गेल्या काही दिवसांपासून सभा व बैठकांचा धुरळा उडत असून, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी जोरदार रणनीती आखली जात आहे.

मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र...काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दांत सूचना देत, ‘काही झाले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे कमळ फुललेच पाहिजे’, असा कानमंत्र दिला. त्यांच्या या निर्देशामुळे भाजपचे जिल्ह्यातील पदाधिकारी चार्ज झाले असून, अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. ज्या भागात भाजपची ताकद अधिक आहे, तिथे मैत्रीपूर्ण लढतीतून कमळ फुलवण्याची तयारी सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे यांचीही गर्जना...मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकांचा धडाका सुरू केल्यानंतर, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आपला जिल्हा खुणावू लागला. बुधवारी त्यांनी थेट ठाण्यातून साताऱ्याला हजेरी लावली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात त्यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचा उपदेश केला. ‘कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्ता बनून काम करा,’ अशा सूचना त्यांनी लोकप्रतिनिधींना केल्या. ‘गाव तिथे शाखा’हा मंत्र दिला. आगामी काळात जिल्ह्यात सेनेची ताकद वाढवणार असल्याचे सांगत, शिवसेना या निवडणुकीत जोरकसपणे उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.

अजित पवार यांचीही चाल!उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वी औंध महोत्सवासाठी जिल्ह्यात येऊन गेले. जरी त्यांनी निवडणुकीसंदर्भात थेट बैठक घेतली नसली तरी, त्यांच्या पक्षाचे जिल्ह्यात दोन आमदार आहेत आणि अकरा तालुक्यांत राष्ट्रवादीला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फळी कार्यरत आहे. त्यांच्याकडूनही कार्यकर्त्यांना निवडणुकीबाबत ‘योग्य त्या’ सूचना दिल्या जात आहेत.

शशिकांत शिंदे यांचीही मोर्चेबांधणीराष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी गाठीभेटी आणि बैठकांचा धडाका पूर्वीच सुरू केला आहे. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यापासून ते कार्यकर्त्यांना एकत्र आणून त्यांना बळ देत आहेत. ‘लोकसभा’ आणि ‘विधानसभे’ची पुनरावृत्ती टाळून, जिल्ह्यात आपला पक्ष अधिक बळकट करण्यासाठी पूर्ण ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याचे संकेत त्यांनी यापूर्वीच दिले आहेत.

चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला...सातारा जिल्ह्याला प्रथमच चार मंत्री लाभले आहेत. यामध्ये बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई आणि ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील याच जिल्ह्याचे असल्याने, यंदाची निवडणूक प्रत्येक नेत्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. या दिग्गज नेत्यांच्या सक्रियतेमुळे सातारा जिल्हा पुन्हा एकदा राज्याच्या केंद्रस्थानी आला आहे. आगामी काळात अनेक राजकीय घडामोडी घडणार असून, महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी कोणती रणनीती आखते हे पाहणे निर्णायक ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Focus: Key Leaders Vie for Power in Local Elections

Web Summary : Satara becomes a political hotspot as top leaders, including the Chief Minister and Deputy Chief Ministers, focus on local elections. With four ministers from the district in the fray, prestige is on the line. Strategies are being formulated to win control of local bodies.