शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

सातारा : अन्नदात्यासाठी होणार अन्नत्याग आंदोलन, १ मार्चपासून शेतकरी संघटना आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 10:57 AM

सरसकट कर्जमुक्तीची गनिमी घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडली. वास्तविक शासनाने कर्जमुक्ती नव्हे तर करवसुलीचा धडाका लावला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी १ मार्चपासून विविध टप्प्यांवर आंदोलन आक्रमक करून शासनाला जाब विचारणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देशेतकरी संघटना आक्रमक, अन्नदात्यासाठी होणार अन्नत्याग आंदोलन१ मार्चपासून विविध आंदोलनाद्वारे होणार शेतकरी हिताची लढाई

सातारा : सरसकट कर्जमुक्तीची गनिमी घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडली. वास्तविक शासनाने कर्जमुक्ती नव्हे तर करवसुलीचा धडाका लावला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी १ मार्चपासून विविध टप्प्यांवर आंदोलन आक्रमक करून शासनाला जाब विचारणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली.रघुनाथ पाटील म्हणाले, राज्यभरात जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्जमाफी झाल्याचे मेसेज शेतकऱ्यांना आले. प्रत्यक्षात मात्र, कर्जमाफी झालीच नाही. आधी बाकीचे पैसे भरा मगच शासनाचे दीड लाख रुपये तुमच्या हातात देऊ, अशी भाषा बँकेकडून वापरली जाऊ लागली आहे.

या सर्व मनमानीला आळा घालण्यासाठी शेतकरी संघटना आणि बळीराजा शेतकरी संघटना एकत्र आली असून, त्या माध्यमातून आंदोलन छेडले जाणार आहे. यावेळी गणेश जगताप, कालीदास आपटे, सीमा परदेशी, विकास जाधव, अंकुश देशमुख, दीपक मोरे, भगवान पालव, शिवाजी कोळेकर, राजनंदन शिंदे, प्रकाश फडतरे उपस्थित होते.

असे आहेत आंदोलनाचे टप्पे१. शेतकऱ्यांच्या वीज बिलापेक्षा जास्तीची रक्कम शासनाने वीज मंडळाकडे जमा केली आहे. त्यामुळे शेतकरी आता घरगुती वापराच्या विजेचे बिल भरणार नाहीत. जे अधिकारी वीज तोडायला येतील त्यांना काळे फासण्याचे आंदोलन राज्यभरात १ मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे.२. इस्लामपूर येथील साहेबराव करपे आणि मालती करपे या शेतकरी जोडप्याने आपल्या चारही लेकरांना विष पाजून स्वत:ही आत्महत्या केली. १९ मार्च १९८६ रोजी झालेल्या या घटनेला ३२ वर्षे झाली. १९८६ ते २०१८ पर्यंत राज्यात ७५ हजार लोकांनी आहुती दिली आहे. शासनाच्या निष्क्रीयतेच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर १९ मार्चला अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.३. देशाच्या स्वातंत्र्यात आपले तारुण्य कामी लावणाऱ्या शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृतींना अभिवादन करून २३ मार्चपासून सांगली येथून हुतात्मा अभिवादन दौरा काढण्यात येणार आहे. याची सांगता २७ मार्चला पुण्यात सभा घेऊन होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील हुतात्मा शेतकऱ्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात ५ संघांच्या मदतीने ४ दिवसांत ७५० सभांचे नियोजन करण्यात आले आहे.४. कामगार दिनाच्या आदल्यादिवशी म्हणजेच ३० एप्रिलला राज्यभरातून २५ लाख शेतकऱ्यांना एकत्रित करून मुंबईत जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीChakka jamचक्काजाम