शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

सातारा :  मच्छीमार महिलांचा रुद्रावतार, संबंधितांना चोप, दमदाटी करणाऱ्या युवकांचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 3:40 PM

खंडाळा तालुक्यातील तोंडल गावच्या हद्दीत नीरा नदीमध्ये मच्छिमारांच्या जाळ्याचे नुकसान केल्याप्रकरणी विचारणा करायला गेलेल्या मच्छीमार महिलांना दमदाटी करण्यात आली. यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. दमदाटी करणाऱ्यांकडून पोलीसांनी तलवार व चाकू जप्त केला आहे. महिलांचा रुद्रावतार पाहताच दमदाटी करणाऱ्या युवकांनी घटनास्थळावरुन पलायन केले.

ठळक मुद्देमच्छीमार महिलांचा रुद्रावतारदमदाटी करणाऱ्या युवकांचे पलायन

सातारा : खंडाळा तालुक्यातील तोंडल गावच्या हद्दीत नीरा नदीमध्ये मच्छिमारांच्या जाळ्याचे नुकसान केल्याप्रकरणी विचारणा करायला गेलेल्या मच्छीमार महिलांना दमदाटी करण्यात आली. यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. दमदाटी करणाऱ्यांकडून पोलीसांनी तलवार व चाकू जप्त केला आहे. महिलांचा रुद्रावतार पाहताच दमदाटी करणाऱ्या युवकांनी घटनास्थळावरुन पलायन केले.

याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी,नीरा नदीमध्ये मच्छिमारीच्या ठेक्याच्या प्रश्नावरुन ठेकेदार - स्थानिक मच्छिमारांच्या प्रश्नांवरुन गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. याबाबत वारंवार बैठका होऊन यावर कोणताही तोडगा निघालेला नाही.

घटनास्थळावरुन तलवार जप्तदरम्यान ,आज,  मंगळवार, दि. १८  रोजी सकाळी तोंडल ता. खंडाळा गावच्या हद्दीत नीरा नदीमध्ये तोंडल येथील स्थानिक मच्छिमारांनी टाकलेल्या जाळ्या ठेकेदारांच्या व्यक्तींनी नदीमधून काढून फाडून टाकल्या. स्थानिक मच्छिमार महिला याबाबत विचारणा करायला गेल्या असता त्यांनाच संबंधितांनी दमदाटी केल्याचा आरोप करत महिलांनी रुद्रावतार धारण करत संबंधितांना चोप देत त्याठिकाणी असणाऱ्या केबिनची खुर्च्यांची, साहित्याची तोडफोड केली.

यावेळी महिलांचा रुद्रावतार पाहून संबंधित युवकांनी घटनास्थळावरुन पलायन केले. यावेळी घटनास्थळी आलेल्या शिरवळ पोलीसांनी घटनास्थळावरुन तलवार जप्त केला असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर