सातारा : जनावरांनी खाल्लेला मृतदेह, घातपाताची शक्यता, पोलिसांकडून तपास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 15:51 IST2018-03-02T15:51:21+5:302018-03-02T15:51:21+5:30

काशीळ-पाल मार्गावरील पाल गावाच्या हद्दीत अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून, जनावरांनी अर्धवट खाल्ला आहे. संबंधित युवकाचा खून करून मृतदेह तेथे टाकण्यात आला असावा, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.

Satara: The dead body of animals, the possibility of death, the police are investigating | सातारा : जनावरांनी खाल्लेला मृतदेह, घातपाताची शक्यता, पोलिसांकडून तपास सुरू

सातारा : जनावरांनी खाल्लेला मृतदेह, घातपाताची शक्यता, पोलिसांकडून तपास सुरू

ठळक मुद्देजनावरांनी खाल्लेला मृतदेहपोलिसांकडून तपास सुरूघातपाताची शक्यता

उंब्रज : काशीळ-पाल मार्गावरील पाल गावाच्या हद्दीत अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून, जनावरांनी अर्धवट खाल्ला आहे. संबंधित युवकाचा खून करून मृतदेह तेथे टाकण्यात आला असावा, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.

या घटनेबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पाल गावाच्या हद्दीत युवकाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती उंब्रज पोलिसांना निनावी फोनद्वारे मिळाली. यानंतर उंब्रज पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

संबंधित मृतदेह हा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. चेहरा प्राण्यांकडून कुरतडण्यात आला होता. मृतदेहाच्या अंगात शर्ट, पॅँट होती. मात्र आंतरवस्त्र नव्हते. हा मृतदेह झाड्याला एका ढोलीत ठेवण्यात आला होता. खून केल्यानंतर संबंधित युवकाचा मृतदेह या ठिकाणी आणून टाकला असावा, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.

Web Title: Satara: The dead body of animals, the possibility of death, the police are investigating