Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:40 IST2025-11-26T13:39:05+5:302025-11-26T13:40:50+5:30
Satara Accident: फलटण तालुक्यात एक थरकाप उडवणारा अपघात घडला. रस्ता ओलांडत असताना मिनी बसने चिरडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला.

Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
महामार्गावर भरधाव वाहनांची ये-जा सुरु होती. दोन जण रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकाजवळ उभे होते. तितक्या वेगात आलेली एक मिनी बस दुभाजकावर चढते आणि हवेत उडते. त्यात एका व्यक्तीच्या अंगावर दुभाजक पडतो आणि तो चिरडला जातो. तर दुसरा व्यक्ती धडकेने खाली पडतो. हा भीषण अपघात सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये घडला आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत.
माहितीनुसार फलटण तालुक्यातील बरड येथे हा अपघात झाला आहे. महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये हा अपघात कैद झाला आहे.
मिनी बस वेगात जात होती. दुभाजकाजवळ येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते दुभाजकाला धडकून हवेत उडाले. मिनी बस इतकी वेगात होती की, दुभाजकही एका व्यक्तीच्या अंगावर पडला. तर दुसरा व्यक्ती दूर फेकला गेला. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर हा अपघात झाला आहे.
साताऱ्यातील महामार्गावर अपघाताचा थरार! रस्ता ओलांडणाऱ्यांना बसने चिरडलं, एकाचा मृत्यू; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO pic.twitter.com/NU79yKgToy
— Namdeo kumbhar (@kumbharnc57) November 26, 2025
या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर मिनी बसमधील चौघांसह पाच जण जखमी झाले आहेत. चौघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिनी बस येण्याच्या काही मिनिट आधी एक तरुण तिथे उभा होता. पण, तो रस्ता पार करून अलिकडे आला. त्यानंतर हा अपघात घडला. त्यामुळे सुदैवाने तरुण वाचला.