शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

४४ ग्रामपंचायतींची सरपंचपदे सर्वसाधारणसाठी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर करण्यात आली. तालुक्यातील ७७ पैकी ४४ ग्रामपंचायतींची सरपंचपदेही ...

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर करण्यात आली. तालुक्यातील ७७ पैकी ४४ ग्रामपंचायतींची सरपंचपदेही सर्वसाधारण गटासाठी आरक्षित केली. त्यापैकी २२ ग्रामपंचायतींची सरपंचपदे ही महिलांसाठी सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आली.

तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील खादी ग्रामोद्योगच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सभापती अंजना कदम या उपस्थित होत्या.

नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या ४२ ग्रामपंचायतींसह तालुक्यातील सर्वच ७७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले. अनुसूचित जातीसाठी सात ग्रामपंचायती राखीव ठेवण्यात आल्या. त्यातील चार ग्रामपंचायतींची सरपंचपदे सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आली. अनुसूचित जमातीसाठी पाच ग्रामपंचायतींची सरपंचपदेही आरक्षित करण्यात आली, तर तीन ग्रामपंचायतींची सरपंचपदे ही महिलांसाठी राखीव ठेवली. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २१ ग्रामपंचायतींची सरपंचपदे निश्चित केली. तर, त्यापैकी १० ग्रामपंचायतींची सरपंचपदे ही सोडत पद्धतीने निश्चित केली.

अनुसूचित जाती महिलांसाठी दांडेघर, गोगवे, कुमठे व वलवण. अनुसूचित जातीसाठी रूळे, खिंगर व दाभेमोहन. अनुसूचित जमाती महिलांसाठी कुंभरोशी, येरणे बुद्रुक व गोरोशी. अनुसूचित जमाती बिरवाडी व मेटगुताड. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी हरचंदी, मोरणी, सोनाट, देवळी, गावढोशी, अवकाळी, एरंडल, मेटतळे, आमशी, भौसे व उचाट. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी शिरवली, आचली, वाळणे, दाभेकर, गोडवली, कासवंड, सौंदरी, नाकिंदा, भेकवली व कळमगाव.

सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी तायघाट, दानवली, पाली तर्फ आटेगाव, कुरोशी, वेळापूर, उंबरी, झांझवड, चतुरबेट, वेंगळे, राजपुरी, हातलोट, चिखली, भीमनगर, पांगारी, खरोशी, खांबील चोरगे, पर्वत तर्फ वाघावळे, लामज, बिरमणी, पारपार, सालोशी व लाखवड. सर्वसाधारण प्रवर्गासाठी देवसरे, मांघर, पारूट, आकल्पे, अहीर, माचुतर, तळदेव, जावली, भिलार, वानवली तर्फ सोळशी, रेणोशी, गुरेघर, आरव, रामेघर, कोट्रोशी, क्षेत्र महाबळेश्वर, आंब्रळ, मोळेश्वर, घावरी, निवळी, दुधगाव व वारसोळी देव.

अनेक गावांत सरपंचपदाचे आरक्षण पडले आहे. त्या वर्गातील सदस्याचे पद ग्रामपंचायतीचे रिक्त असल्याने अशा अनेक गावांतील कारभार सरपंचाविना चालणार आहे. अशा वेळी उपसरपंच हाच गावचा मुख्य कारभारी होणार आहे, अशी तालुक्यातील निम्म्यापेक्षा अधिक गावांतील स्थिती आहे.