शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

समर्थ मंदिर बसथांबा अखेर हलविला!

By admin | Updated: November 28, 2015 00:21 IST

चौकाने घेतला श्वास : बोगद्याकडून येणारी वाहने आता गोविंदनगरी इमारतीजवळ थांबणार लोकमतचा प्रभाव

सातारा : कित्येक वर्षांपासून समर्थमंदिर परिसरात उभारत असलेल्या एसटीमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. समर्थ मंदिराजवळचा हा थांबा हलविला असून, बोगद्याकडून शहरात येणाऱ्या एसटी बसेस गुरुवारपासून गोविंदनगरी इमारतीजवळ उभारण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे समर्थ मंदिर चौकाने मोकळा श्वास घेतला आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस येथील समर्थमंदिर चौकात अनेक वर्षांपासून उभ्या केल्या जात होत्या. रोज सकाळी नऊ ते अकरा व सायंकाळी पाच ते साडेसहा या वेळेत गाड्यांच्या फेऱ्या वाढलेल्या असतात. त्याचवेळी शाळा-महाविद्यालय भरणे किंवा सुटलेले असल्याने या चौकात वाहनांची वर्दळ असत. त्यामुळे अर्धा-अर्धा तास वाहतूक विस्कळीत होत होती. ही बाब ‘लोकमत’ने एसटी प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. याची दखल घेऊन एसटीने येथील थांबा गुरुवारपासून पुढे हलविला आहे.बोगदा व कास परिसरातून शहरात येणाऱ्या गाड्या चौकातच तिरक्या लावल्या जात होत्या. पूर्वी या परिसरातील लोकसंख्या मर्यादित होती. त्यामुळे फारशी समस्या जाणवत नव्हती. या परिसरात लोकवसाहत वाढली आहे. तसेच घरटी दोन-दोन मोटारसायकल आल्याने चौकात वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. सकाळी व सायंकाळी शाळा, महाविद्यालय सुटण्याच्या वेळेत वाहतुकीची कोंडी होत होती. विभागीय वाहतूक शाखेने काही दिवसांपूर्वी या परिसराची पाहणी करून बोगद्याकडून येणाऱ्या गाड्या चौकात न थांबता गोविंदनगरी इमारतीजवळ उभ्या करण्याचा निर्णय घेतला. त्याला सातारा पोलिसांची वाहतूक शाखा व पालिकेने परवानगी दिल्याने या बसथांब्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार गुरुवारी दिवसभर एक कर्मचारी या ठिकाणी उभा केला होता. ही व्यक्ती सर्व गाड्यांच्या चालकांना चौकात उभ्या न करण्याच्या सूचना करत होती. (प्रतिनिधी)