शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीचा निकाल तालुक्याचा कौल नव्हे

By admin | Updated: August 26, 2015 22:42 IST

शंभूराज देसार्इंचा टोला : विरोधकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते

पाटण : ‘तालुक्यातील दोन लाख ८० हजार मतदारांच्या तुलनेत पाटण बाजार समितीचे चार हजार मतदार म्हणजे केवळ १.४३ टक्के मतदार होय. तेव्हा बाजार समितीचा निकाल म्हणजे तालुक्याचा कौल नव्हे. बाजार समितीच्या निकालाची तुलना माजी आमदार पाटणकर आणि त्यांचे पूत्र विधानसभेच्या निवडणुकीशी करत असतील तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी लागेल,’ अशी टीका आमदार शंभूराज देसार्इंनी पत्रकाद्वारे केली आहे.आमदार देसाई म्हणाले, ‘पाटणकर पिता-पुत्रांनी या निकालाने एवढे हुरळून जाण्याची गरज नाही. कारण विधानसभेचा १८,८२४ मताधिक्यांनी दिलेला कौल आणि बाजार समिती अशी तुलना करून तालुक्याच्या राजकारणाची गणिते पाटणकर मांडत असतील तर त्यांचे बुद्धिकौशल्य खूप छान आहे. बाजार समितीची सत्ता ताब्यात राहिलेली पाहून माजी आमदारांनी दिलेल्या प्रतिक्रियेत शंभूराज देसार्इंनी मतदारांना फसव्या घोषणा दिल्यामुळे ते विधानसभेत निवडून आले, असे सांगितले. तेव्हा माझा १८ हजारांच्या मताधिक्याचा विजय हा पाटणकरांच्याच फसव्या घोषणांचा परिणाम होता.अद्याप मी जमिनीवर आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी जमिनीवरच राहणार आहे. बाजार समितीची निवडणूक झाली म्हणजे आता यापुढे निवडणुका होणार नाहीत का? तेव्हा येत्या काळात पिता-पुत्र कोठे आहेत, ते जनता दाखवून देईल. नुकत्याच झालेल्या ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पाटण तालुक्यात पार पडल्या. यामध्ये जनतेने दाखवून दिले आहे. ९५ पैकी ५७ ग्रामपंचायती देसाई गटाच्या आहेत.’ (वार्ताहर)सरपंचांचा कोतवाल केलामोदी लाटेमुळे माझा विधानसभेत विजय झाला, असे सांगून अकलेचे तारे तोडणाऱ्या एकाचा पाटणकरांनी सरपंचाचा कोतवाल केला असून, सभापती व्हायचे सोडून कोतवाल झालेल्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोला आमदार शंभूराज देसाई यांनी पाटणकरांच्या फळीतल्या एका पदाधिकाऱ्याला लगावला.