शेतकरीविरोधी कायदे रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:41 IST2021-01-13T05:41:54+5:302021-01-13T05:41:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कायदे असंविधानिक पद्धतीने लागू केले आहेत. त्यामुळे हे कायदे ...

Repeal anti-farmer laws | शेतकरीविरोधी कायदे रद्द करा

शेतकरीविरोधी कायदे रद्द करा

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कायदे असंविधानिक पद्धतीने लागू केले आहेत. त्यामुळे हे कायदे रद्द होईपर्यंत आरपारची लढाई सुरूच राहणार आहे,’ अशी माहिती राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आली.

याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केंद्र शासनाने कोरोना विषाणूच्या नावाखाली लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांच्या विरोधात कृषीचे तीन कायदे केलेले आहेत. या कायद्यामुळे शासकीय कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विविध उत्पादनांसाठी मिळणारा हमीभाव तसेच शेतकरी हिताच्या अनेक बाबींवर अप्रत्यक्षरीत्या गंभीर परिणाम होणार आहे. या कायद्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असणारा शेती व्यवसाय व शेतकरी हळूहळू उद्ध्वस्त होणार आहे. हे अन्यायकारक कायदे केंद्राने मागे घ्यावेत यासाठी ४५ दिवसांपासून शेतकरी दिल्लीत हाल, उपासमार सोसत धरणे आंदोलन करत आहेत. तरीही केंद्र शासन त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. अशा स्थितीत शेती व्यवसायाशी निगडीत प्रत्येकाने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणे आवश्यक आहे. या गोष्टीची जाणीव ठेवूनच राष्ट्रीय किसान मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी व आंदोलाच्या समर्थनार्थ शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करणार आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही हे आंदोलन करण्यात येत आहे.

यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप बोराटे, अमोल बनसोडे, अ‍ॅड. विलास वहागावकर अनील वीर, वैभव गवळी, रफिक मुलाणी, डॉ. बाबासाहेब ननावरे, हंबीरराव बाबर, वामन मस्के, दिलीप गायकवाड, सुरेश गायकवाड, दीपक मालुसरे, अमित सूर्यवंशी, अजित नितनवरे आदी उपस्थित होते.

.................................................

Web Title: Repeal anti-farmer laws