नेवेकरवाडी शाळेचे कार्य उल्लेखनीय : कल्पना तोडरमल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:52 IST2021-02-25T04:52:23+5:302021-02-25T04:52:23+5:30

कुडाळ : कोरोना महामारीत शाळा बंद स्थितीत असूनही नेवेकरवाडी शाळेच्या परिसरातील विविधरंगी पानाफुलाप्रमाणेच या शाळेतील सर्व विद्यार्थी ...

Remarkable work of Nevekarwadi School: Kalpana Todarmal | नेवेकरवाडी शाळेचे कार्य उल्लेखनीय : कल्पना तोडरमल

नेवेकरवाडी शाळेचे कार्य उल्लेखनीय : कल्पना तोडरमल

कुडाळ : कोरोना महामारीत शाळा बंद स्थितीत असूनही नेवेकरवाडी शाळेच्या परिसरातील विविधरंगी पानाफुलाप्रमाणेच या शाळेतील सर्व विद्यार्थी शैक्षणिक आणि सर्वांगीणदृष्टीने विकसित झाले आहेत. याकरिता गुणवत्तापूर्ण व सर्वांगीण विकासासाठी शाळेने केलेले कार्य उल्लेखनीय आहे,’ अशा शब्दांत गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल यांनी जिल्हा परिषदेच्या नेवेकरवाडी शाळेचे कौतुक केले.

नेवेकरवाडी (ता. जावळी) या प्राथमिक शाळेला गटशिक्षणाधिकारी यांनी भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे, शाळेचे मुख्याध्यापक नितीन मोहिते, शेखर रोकडे उपस्थित होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी तोडरमल यांनी पहिलीतील कोटीपर्यंतच्या संख्या वाचन व चार अंकी संख्यांचे लेखन करणारे व सर्व इंग्रजी वर्णाक्षरे अचूक वाचनाबरोबर जोडाक्षरांसह अस्खलितपणे शब्द वाचन करणारा पहिलीचा संपूर्ण वर्ग, सुंदर व हावभावयुक्त कथा सांगणारे दुसरीचे विद्यार्थी तसेच तिसरी व चौथीच्या मुलांचे नेटकेपणाने मांडलेले विविध प्रकल्प, सुंदर हस्ताक्षरात लेखन केलेल्या त्यांच्या वह्यांमधील सोडवलेले स्वाध्याय याची तपासणी केली.

Web Title: Remarkable work of Nevekarwadi School: Kalpana Todarmal