शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

‘सह्याद्री’पेक्षा प्रादेशिक वन हद्दीत जास्त बिबटे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:27 AM

संजय पाटील । कºहाड : श्वापदांची मोजदाद ‘वन्यजीव’च्या हद्दीत होते; पण ‘प्रादेशिक वन’हद्दीत अशी गणना होत नाही. किती अन् ...

संजय पाटील ।कºहाड : श्वापदांची मोजदाद ‘वन्यजीव’च्या हद्दीत होते; पण ‘प्रादेशिक वन’हद्दीत अशी गणना होत नाही. किती अन् कुठे प्राणी वावरतायत, हेच या विभागाला माहिती नसतं. बिबट्याचंहीअसंच झालंय. त्यांची संख्या किती, हेच निश्चित नाही. मात्र, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जेवढे बिबट्या वावरतायत, त्यापेक्षा जास्त संख्येत ते प्रादेशिक हद्दीत वावरत असल्याचा निष्कर्ष प्राणी अभ्यासकांनी काढलाय.प्रादेशिक वन विभागाचे क्षेत्र गावोगावी डोंगररांगांमध्ये विखुरले गेले आहे. त्यामुळे या क्षेत्रात वावरणाऱ्या प्राण्यांचा मागमुस काढणे कठीण. मात्र, प्राण्यांची जेवढी विविधता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळून येते, त्याचपटीत कमी-जास्त प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी डोंगर रांगांमध्ये वावरत असल्याचे प्राणी अभ्यासकांचे मत आहे.कºहाड व पाटण तालुक्यातील वाढत्या बिबट्याप्रवण क्षेत्राचा विचार करता प्रादेशिक हद्दीत सह्याद्री प्रकल्पापेक्षा जास्त बिबट्या वावरत असल्याचे मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे सांगतात.‘गत काही वर्षांत बिबट्याप्रवण क्षेत्र कमालीचं वाढलंय. वारंवार हल्लेही होतायत. ज्याठिकाणी पूर्वी कधी मागमुस नव्हता, त्याठिकाणीही सध्या बिबट्या दिसतोय. हा प्राणी चोवीस तासांत सुमारे चौदा चौरस किलोमीटर क्षेत्रात फिरतो. सध्याचे बीटनिहाय बिबट्याप्रवण क्षेत्र तपासले तर प्रत्येक बीटमध्ये किमान दोन ते तीन बिबट्या असावेत आणि त्यांची एकूण संख्या सह्याद्री प्रकल्पातील संख्येपेक्षा जास्त असावी,’ असा निष्कर्ष असल्याचे रोहन भाटे म्हणाले. तर मध्यंतरी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात कºहाड आणि पाटण तालुक्याच्या प्रादेशिक वनहद्दीत सुमारे शंभर बिबट्यांचा वावर असल्याचे समोर आले होते, असे प्राणी अभ्यासक नाना खामकर यांनी सांगितले.‘जंगल हा अधिवासच बिबट्या विसरलेत. उसाचे शेत हेच जंगल असल्याचा अनुवंशिक बदल त्यांच्यामध्ये झाल्याचे दिसून येते. प्रादेशिक वनहद्दीत म्हणजेच कोयना आणि चांदोली अभयारण्य वगळता कºहाड, पाटण तालुक्यांतील इतर प्रदेशात शंभरपेक्षा जास्त बिबटे असावेत,’ असे खामकर सांगतात.प्रादेशिक वन विभागाचे क्षेत्रराखीव क्षेत्र :१२,५८५.५७ हेक्टरअवर्गित क्षेत्र :१४.६५ हेक्टरसंपादित क्षेत्र :५५३.६७ हेक्टरएकूण क्षेत्र :१३,१५३.७९ हेक्टरकºहाडचे बिबट्याप्रवण क्षेत्र (हेक्टरमध्ये)मलकापूर : ७७०.०४नांदगाव : ७२८.१९कोळे : १०३९.४२कासारशिरंबे : ५८५.११०तांबवे : ९००.९२म्हासोली : ८३२.५२वराडे : १२८४.४००म्होप्रे : ९१६.१८०100पेक्षा जास्त बिबट्येप्रादेशिक वनहद्दीत असावेत असे अभ्यासक सांगतात.44व्याघ्र प्रकल्पातएकूण बिबट्या