शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

कागदी घोडे नाचविण्यापेक्षा सरसकट पंचनामे करा--जयकुमार गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 20:34 IST

पाऊस पडत असल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्या झाल्या नाहीत. कांदा, बाजरी, मका, बटाटा, आले पिकासह कडधान्यांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजाचं कंबरडं मोडलंय. जीवापाड परिश्रम करून जगविलेल्या अनेक फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकागदी घोडे नाचविण्यापेक्षा सरसकट पंचनामे करा

म्हसवड : ह्यमाण आणि खटाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे, फळबागांचे आणि अनेकांच्या जंगम मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदी घोडे नाचवायचे बंद करून दोन्ही तालुक्यांत सरसकट पंचनामे करावेत, अशी सूचना आमदार जयकुमार गोरे यांनी केली.

दहिवडीतील विश्रामगृहावर आयोजित बैठकीत आमदार गोरेंनी ही सूचना केली. प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार बाई माने, कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.आमदार गोरे म्हणाले, कायम दुष्काळाच्या झळा सोसणा-या माण आणि खटाव तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. खरिपाची पिके अतिवृष्टीमुळे वाया गेली आहेत. अद्यापही पाऊस पडत असल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्या झाल्या नाहीत. कांदा, बाजरी, मका, बटाटा, आले पिकासह कडधान्यांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजाचं कंबरडं मोडलंय. जीवापाड परिश्रम करून जगविलेल्या अनेक फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जंगम मालमत्तांचेही नुकसान झाले आहे.कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता वेळ न दवडता नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत. पंचनामा करणाºया एजन्सीज व्यवस्थित काम करणार नाहीत. त्यांचा मेळही बसणार नाही. सर्व ग्रामसेवकांना पंचनामे करण्याचे आदेश द्या. प्रत्येक शेतकºयाच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रांत आणि तहसीलदारांनी द्यावेत. अशा सूचनाही आमदार गोरे यांनी केल्या.आमदार गोरे यांनी माण तालुक्यातील दिवडसह विविध गावांना भेटी दिल्या. अनेक ठिकाणी पाण्यात कुजलेली विविध पिके आणि फळबागांचे झालेले नुकसान अधिका-यांना दाखवून सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले.चालढकल केली तर गाठ माझ्याशीविधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक साधणाºया आमदार जयकुमार गोरे यांनी कामाचा सपाटा सुरू केला आहे. भाजपच्या पक्ष बैठकीला मुंबईत हजेरी लावण्यापूर्वीच त्यांनी जिल्हाधिकाºयांना पंचानामे करण्याविषयी निवेदन दिले होते. मुंबईतून आल्यावर लगेच त्यांनी अधिकाºयांची बैठक घेऊन सरसकट पंचनाम्याच्या सूचना केल्या. मुख्यमंत्र्यांनी तर मोबाईल फोटोवरूनही शेतकºयांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अधिकाºयांनी पंचनामे करताना चालढकल केली तर गाठ माझ्याशी आहे, अशी तंबीही गोरेंनी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfloodपूर