शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

..तर पापी असण्यात आनंद, पुण्यवाणांचे आभार; रामराजे नाईक-निंबाळकराचे जयकुमार गोरेंना प्रतिउत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 18:26 IST

फलटण :  माझ्या ‘पापा’मुळे महाराष्ट्राचे कृष्णा लवादाचे पाणी वाचले. तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व धरणे जी १९९६ च्या पुढे सुरू ...

फलटण :  माझ्या ‘पापा’मुळे महाराष्ट्राचे कृष्णा लवादाचे पाणी वाचले. तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व धरणे जी १९९६ च्या पुढे सुरू झाली. त्यामध्ये उरमोडी, तारळी, जिहे कटापूर हे प्रोजेक्ट आहेत. हे पाप असेल तर ‘पापी’ असण्यात मला आनंद आहे. पुण्यवाणांचे आभार मानतो, असे प्रतिउत्तर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आमदार जयकुमार गोरे यांना दिले आहे.

रामराजेंनी म्हटले की, पुण्यवान लोकप्रतिनिधी जे पुण्य करतात ते मला जमत नाही. माझ्या ‘पापा’मुळे महाराष्ट्राचे कृष्णा लवादाचे पाणी वाचले. तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व धरणे जी १९९६ च्या पुढे सुरू झाली. त्यामध्ये उरमोडी, तारळी, जिहे कटापूर हे प्रोजेक्ट आहेत. हे पाप असेल तर ‘पापी’ असण्यात मला आनंद आहे. पुण्यवाणांचे आभार मानतो.

माण तालुक्यातील सीतामाई घाट रस्त्याचे भूमिपूजन माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते दोन दिवसांपूर्वी झाले होते, यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली होती. या टीकेला रामराजेंनी सोशल मीडियावरून प्रतिउत्तर दिले आहे.

रामराजेंच्या प्रतिउत्तरामुळे पुन्हा एकदा फलटण आणि माणचे राजकारण तापण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या निमित्ताने सभापती रामराजे आणि जयकुमार गोरे एकत्र आल्याच्या वावड्या उठल्या होत्या. जयकुमार गोरे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार घेऊन गप्प बसणे पसंद केले होते. यामुळे, त्यांचे कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले होते. जनतेतपण चलबिचल सुरू झाल्याने बॅकफूटवर गेलेले गोरे यांनी पुन्हा आक्रमकपणा आणण्यासाठी संधीचा शोध घेतला.शांत बसलेले जयकुमार गोरे यांनी माण तालुक्याचा पाणी प्रश्न हाती घेताना फलटण व माणच्या सीमेवर असणाऱ्या सीतामाई घाट रस्त्याच्या कामानिमित्ताने रामराजेंवर टीका करून त्यांना ललकारले. त्याला तातडीने रामराजेंनी प्रत्युत्तर देऊन आपणही संघर्षाला तयार असल्याचे दाखवून दिले आहे. आपल्यातही तेवढा आक्रमकपणा आहे आणि जशास तसे उत्तर देण्याची तयारी असल्याचे रामराजेंनी एक प्रकारे सूचित केल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसते. यामुळे नजीकच्या काळात दोघांमधील संघर्ष आणखी तीव्र होऊन आरोप-प्रत्यारोपाची नवी मालिका सुरू होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरJaykumar Goreजयकुमार गोरे