शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

रामराजे सांगणार त्याच्याच गळ्यात पडणार माळ

By admin | Updated: September 11, 2014 23:12 IST

फलटण तालुका : नवख्या उमेदवारांमुळे ‘पतिराज’ येण्याची कर्मचाऱ्यांना भीती

नसीर शिकलगार -फलटण -फलटण पंचायत समितीवर गेली २० वर्षे राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांची सत्ता आहे. त्यामुळे रामराजे सांगतील त्याच महिलेच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडणार आहे. पंचायत समितीमध्ये १४ पैकी १२ राष्ट्रवादी काँग्रेसचे तर दोन जण काँग्रेसचे सदस्य आहेत. काँग्रेसचे दोन्ही सदस्य खुल्या प्रवर्गातील असल्याने विरोधी पक्षाकडून कोणी इच्छुक असण्याचा प्रश्नच येत नाही. सभापतिपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित असल्याने या पदासाठी कोळकी पंचायत समिती गणातील सुनंदा शिंदे, बरड गणातील स्मिता शिंदे, आसू गणातील वैशाली गावडे या तिघीजणी प्रमुख उमेदवार आहेत.निवडून आलेल्या तिघीही पहिल्यांदाच निवडून आल्याने त्यांना अनुभवाची कमी असणार आहे. त्यामुळे महिला सभापतींच्या पतीचा हस्तक्षेप वाढण्याची भीती कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे. सभापतिपदासाठी इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. रामराजेंनीही अद्याप याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे सभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याची उत्सुकता वाढू लागलेली आहे.