शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा शेतकऱ्यांना पाचपट मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:36 IST

कऱ्हाड : पार्ले, बाबरमाची, सयापूर, यशवंतनगर, शिरवडे या कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांना पुणे-मिरज-लोंढा रेल्वे दुपदरीकरणामध्ये संपादित होणाऱ्या जमिनीचा बाजारभावाच्या पाचपट ...

कऱ्हाड : पार्ले, बाबरमाची, सयापूर, यशवंतनगर, शिरवडे या कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांना पुणे-मिरज-लोंढा रेल्वे दुपदरीकरणामध्ये संपादित होणाऱ्या जमिनीचा बाजारभावाच्या पाचपट बागायती जमिनीप्रमाणे मोबदला देण्यात आला आहे. कऱ्हाडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते पार्ले येथील शेतकऱ्यांना मोबदल्याच्या धनादेशांचे नुकतेच वाटप करण्यात आले.

यावेळी रेल्वे आंदोलनाचे शेतकरी नेते सचिन नलवडे, प्रकल्पबाधित शेतकरी दिनकर नलवडे, भीकू नलवडे, तुकाराम नलवडे, भीमराव पाटील, रामचंद्र जाधव, संजय नलवडे, तानाजी जाधव, अशोक नलवडे, तानाजी नलवडे, शिवाजी नलवडे, विनोद नलवडे, संतोष नलवडे, सनी नलवडे, सचिन पाटील उपस्थित होते.

गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांचा रेल्वे प्रशासनाविरोधात लढा सुरु होता. शेतकऱ्यांना मोबदला न देता रेल्वे विभागाने विविध ठिकाणी कामे सुरु केली होती. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रेल्वेच्या हद्दीचे खांब उभे केले होते. शेतकऱ्यांची जमीन आमचीच असल्याचा दावा रेल्वे प्रशासन करत होते. यावेळी शेतकऱ्यांना सोबत घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांनी मोठा लढा उभा केला. रेल्वेची विनामोबदला सुरु असलेली कामे सचिन नलवडे यांनी बंद केली होती. त्यानंतर तत्कालीन खासदार उदयनराजे भोसले, जिल्ह्याधिकारी श्वेता सिंघल, प्रांत हिम्मत खराडे, भूसंपादन शाखेचे दिनकर ठोंबरे व रेल्वे अधिकारी यांची शेतकऱ्यांसोबत बैठक होऊन शेतकऱ्यांच्या जमिनी सातबाऱ्याप्रमाणे मोजण्याचे ठरले. त्यानुसार कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करण्यात आली. मोजणी मध्ये रेल्वेच्या प्रस्तावातील जमिनीच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त जमीन रेल्वेसाठी संपादित होत असल्याचे निदर्शनास आले.

नुकतेच या गावातील सर्व शेतकऱ्यांना वाढीव क्षेत्रासह बाग़ायती जमिनीप्रमाणे बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळाला आहे. जमिनीला पाच लाख, दीड लाख रुपये गुंठाप्रमाणे तर बाधित होणाऱ्या फळझाडांना पुढील पीक गृहित धरून मोबदला मिळाला आहे. घर, शेड, विहीर यालाही शासन निर्णयानुसार चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

कोट

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय असून, या आंदोलनासाठी विविध गावातील ज्येष्ठ लोकांनी सहकार्य केले. तसेच प्रसारमाध्यमांनीही याकडे लक्ष देऊन प्रश्न ज्वलंत ठेवला. कऱ्हाड विमानतळ भूसंपादनाचा अनुभव समोर असल्याने तुटेपर्यंत न ताणता प्रमुख मागण्या मान्य झाल्याने शेतकऱ्यांनी भूसंपादनाला सहमती दिली. शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत लढा सुरु राहणार आहे.

- सचिन नलवडे

शेतकरी नेते

फोटो

कऱ्हाड येथे शेतकऱ्यांना धनादेश प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी धनादेश प्रदान केले. यावेळी सचिन नलवडे उपस्थित होते.