जर्मन तरुणांनी विवस्त्र होऊन जेलमध्ये घेतला धिंगाणा; कर्मचाऱ्यांना केली मारहाण  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 03:15 PM2021-02-24T15:15:23+5:302021-02-24T15:22:23+5:30

satara Crime news- वाई येथे कुंड्यामध्ये गांजाची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सर्गीस व्हिक्‍टर मानका (वय 31), सेबेस्टीन स्टेन मुलर (वय 25 दोन्ही रा. जर्मनी, सध्या रा. नंदनवन कॉलनी, वाई) या संशयितांनी सातारा जिल्हा कारागृहात विवस्त्र होऊन धिंगाणा घातल्याची घटना घडली. एवढेच नव्हे तर संशयितांनी कारागृहातील खोली क्रं 5 मध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तसेच शौचालयाच्या दरवाजाची तोडफोड करत कारागृह कर्मचारी संदीप फाळके व रमेश ओव्हाळ यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाणही केली.

Prison staff beaten by German youth | जर्मन तरुणांनी विवस्त्र होऊन जेलमध्ये घेतला धिंगाणा; कर्मचाऱ्यांना केली मारहाण  

जर्मन तरुणांनी विवस्त्र होऊन जेलमध्ये घेतला धिंगाणा; कर्मचाऱ्यांना केली मारहाण  

Next
ठळक मुद्देजर्मन तरुणांकडून कारागृहातील कर्मचाऱ्यांना मारहाण स्वतः झाले विवस्त्र; सीसीटीव्हीचीही तोडफोड

सातारा: वाई येथे कुंड्यामध्ये गांजाची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सर्गीस व्हिक्‍टर मानका (वय 31), सेबेस्टीन स्टेन मुलर (वय 25 दोन्ही रा. जर्मनी, सध्या रा. नंदनवन कॉलनी, वाई) या संशयितांनी सातारा जिल्हा कारागृहात विवस्त्र होऊन धिंगाणा घातल्याची घटना घडली. एवढेच नव्हे तर संशयितांनी कारागृहातील खोली क्रं 5 मध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तसेच शौचालयाच्या दरवाजाची तोडफोड करत कारागृह कर्मचारी संदीप फाळके व रमेश ओव्हाळ यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाणही केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, वाई शहरातील नंदनवन कॉलनीतील "विष्णू श्री स्मृती' या बंगल्यात हायड्रोपोनिक ग्रो सिस्टीमचा वापर करून बंगल्याच्या तीन बेडरूममध्ये, गॅलरीत, टेरेसवर कुंड्यामध्ये गांजाची लागवड केल्याने पोलिसांनी 29 किलो गांजा इतर साहित्य असा आठ लाख 21 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून सर्गीस मानका, सेबेस्टीन मुलर या दोन जर्मन नागरिकांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली होती.

दरम्यान दि.22 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संशयितांनी कारागृह कर्मचारी फाळके व ओव्हाळ या दोघांशी उद्धट वर्तन करण्यास सुरूवात केली. संशयितांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण करून कारागृहातच विवस्त्र होऊन धिंगाणा घातला.

हा प्रकार शांत झाल्यानंतर फाळके व ओव्हाळ हे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पंधरा खोली विभागात गस्त घालत असताना त्यांना पाहून संशयितांनी चिडून जावून पंधरा खोली विभागातील ते बंधिस्त असलेल्या खोली क्रं 5 मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तसेच शौचालयाच्या दरवाजाची तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Prison staff beaten by German youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.