शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

फलटण तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

फलटण : फलटण शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून ढगाळ हवामानासह वादळी वारा सुटत आहे. रविवारी सायंकाळी साडेचारपासून शहरासह ...

फलटण : फलटण शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून ढगाळ हवामानासह वादळी वारा सुटत आहे. रविवारी सायंकाळी साडेचारपासून शहरासह उपनगरांमध्ये ढगाळ हवामानासह वादळी वारा सुटला अन् विजांचा कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात व उपनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस मोठ्या प्रमाणात झाला.

फलटणसह परिसरात रविवारी दुपारी तीनपासूनच शहरात ढगाळ हवामान तयार झाल्याने उकड्याचा अधिक त्रास जाणवत होता. नागरिक घरात असतानाही उकाड्याने घामाघूम झाले. सायंकाळी साडेचारपासून वातावरणात अचानकपणे बदल झाला आणि आकाशात ढगांनी अधिकच गर्दी केली. सोसाट्याचा वादळी वारा सुटला. आकाशात विजा चमकू लागल्या अन् ढगांचा गडगडाटही वाढला. काही वेळेतच शहराच्या मध्यवर्ती भागासह शहराच्या उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली.

महात्मा फुले चौक, डी. एड. कॉलेज चौक, पृथ्वी चौक व कोळकी या भागात पावसाचा वेग अधिक राहिला तर विडणीमध्येही जोरदार पावसासह गारांचा वर्षावही झाला. तालुक्यातील काही भागांत मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. काही वेळेतच रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते.

साडेचार वाजेपासून टपोरे थेंब पडण्यास सुरूवात झाली अन् काही मिनिटांतच सरी कोसळू लागल्याने घराबाहेर पडलेल्या नागरिकांसह दुकानदारांची त्रेधातिरपिट उडाली. वादळी वारा सुटताच शहरासह उपनगरांमधील विद्युतपुरवठा महावितरणकडून नेहमीप्रमाणे खंडित करण्यात आला होता. वादळी वारा थांबताच पुन्हा वीजपुरवठा पूर्ववत केला गेला.

पावसाने उघडीप देताच काही उपनगरीय परिसरांमध्ये अस्ताला जाणाऱ्या सूर्यनारायणाने दर्शन दिल्याने अल्हाददायक वातावरण अनुभवयास आले.

मागील काही दिवसांपासून शहरात उन्हाची तीव्रता अधिकच जाणवत होती. पारा चाळिशीला टेकल्याने वातावरणात उष्मा कमालीचा वाढला होता. अवकाळी पावसाने सायंकाळी लावलेल्या दमदार हजेरीमुळे वातावरण काही प्रमाणात थंड झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना संध्याकाळनंतर दिलासा मिळाला. मागील चार ते पाच दिवसांपासून कमाल व किमान तापमानात वाढ होत होती; मात्र पावसामुळे रविवारी नागरिकांना अल्हाददायक वातावरणाने दिलासा मिळाला.

फोटो २२फलटण-रेन

फलटण येथील माळजाई परिसरात रविवारी पावसाने हजेरी लावली होती. (छाया : नसीर शिकलगार)