राज्यातील सर्पमित्र आंदोलनाच्या तयारीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST2021-03-22T04:35:05+5:302021-03-22T04:35:05+5:30

वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये कोणताही वन्यजीव पकडणे किंवा बंदिस्त करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र, मनुष्यवस्तीत येणाऱ्या सापांचे मनुष्यापासून तसेच ...

Preparing for Sarpamitra movement in the state! | राज्यातील सर्पमित्र आंदोलनाच्या तयारीत!

राज्यातील सर्पमित्र आंदोलनाच्या तयारीत!

वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये कोणताही वन्यजीव पकडणे किंवा बंदिस्त करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र, मनुष्यवस्तीत येणाऱ्या सापांचे मनुष्यापासून तसेच मनुष्याचे सापांपासून संरक्षण व्हावे, यासाठी वन विभागाकडे कोणतीही उपाययोजना नाही. तसे मनुष्यबळही नाही. त्यामुळे सापांच्या रक्षणासाठी सर्पमित्रांना धाव घ्यावी लागते. काही तोतयांकडून कसलीही माहिती नसताना चुकीच्या पद्धतीने साप पकडले जातात. त्यामुळे सापांचे हाल होत आहेत. तर काही वेळा सर्पदंशाने लोक दगावत आहेत. दिवसभरात राज्यात किती साप पकडले, कुठे पकडले, कोणी पकडले व ते सुरक्षित जंगलात सोडलेत का, याची कोणतीही नोंद वनविभागाच्या कार्यालयात नाही. त्यामुळे साप जास्त दिवस बंदिस्त करून ठेवणे, दुर्मीळ सापांची देवाणघेवाण करणे, सापांचे खेळ करणे यासारख्या गोष्टी वाढत आहेत. हे सर्व थांबावे यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. सर्पमित्रांना योग्य प्रकारे हे कार्य करता यावे, यासाठी राज्यातील सर्पमित्रांकडून २३ मार्च रोजी निवेदन देण्यात येणार आहे.

- चौकट

सर्पमित्रांच्या मागण्या

१) सर्पमित्रांची नोंद वन विभागात करावी.

२) साप आढळल्यास प्रथम वन विभागाशी संपर्क व्हावा.

३) वन विभागाडून सर्पमित्राला पाचारण करण्यात यावे.

४) दिवसभरात पकडलेले साप रोजच्या रोज सोडण्यात यावेत.

७) नोंदणीकृत सर्पमित्राव्यतिरिक्त साप पकडणाऱ्यावर कारवाई करावी.

८) सर्पमित्रांना युनिफॉर्म, ओळखपत्र व सेफ्टी किट द्यावे.

९) सर्पमित्राला दंश झाल्यास वैद्यकीय खर्च शासनामार्फत करावा.

Web Title: Preparing for Sarpamitra movement in the state!