Satara Crime: विवाहितेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; एकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 17:31 IST2025-07-29T17:31:22+5:302025-07-29T17:31:46+5:30

पीडितेच्या नावाने अश्लील वेबसाइटवर खाते उघडले

Pornographic video of a married woman goes viral in karad Satara Case registered against one | Satara Crime: विवाहितेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; एकावर गुन्हा दाखल

संग्रहित छाया

कऱ्हाड : तालुक्यातील एका गावात विवाहितेवर वारंवार अत्याचार करून तिचा अश्लील व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने याबाबतची फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील एका गावातील पीडित महिलेची संशयिताशी ओळख झाली होती. त्या ओळखीचा फायदा घेत त्याने विवाहितेशी जवळीक वाढवली. तुझे इतरांशी बोलतानाचे फोटो माझ्याकडे आहेत. ते फोटो घरी दाखवून तुझी बदनामी करेन, अशी धमकी देत त्याने १० मे २०२३ पासून संबंधित विवाहितेवर वारंवार अत्याचार केला.

सुरुवातीला भीतीपोटी विवाहितेने याबाबतची माहिती कोणालाही दिली नाही. मात्र, संशयिताने वारंवार हाच प्रकार केल्यामुळे पीडितेने याबाबत आपल्या भावाला माहिती दिली. त्याने संशयिताला बोलावून घेत समज दिली होती. मात्र, त्यानंतरही त्याने पीडितेला त्रास देणे सुरूच ठेवले.

मधल्या कालावधीत संशयिताने पीडितेच्या नावाने अश्लील वेबसाइटवर खाते उघडले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतरही संशयिताला ताकीद देण्यात आली होती. तसेच पीडिता कुटुंबासह परगावी राहण्यास गेली. मात्र, तरीही संशयिताकडून तिला त्रास देणे सुरूच होते. नुकतेच त्याने पीडितेचा काढलेला एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

हा व्हिडिओ पीडितेच्या कुटुंबीयांनी पाहिल्यानंतर त्यांनी याबाबत तिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी तिने सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Pornographic video of a married woman goes viral in karad Satara Case registered against one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.