युवतीला व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज आणि व्हिडीओ,पोलीस पाटलावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 14:57 IST2021-07-07T14:55:18+5:302021-07-07T14:57:25+5:30

Crimenews Satara Karad: युवतीला व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस पाटलावर कऱ्हाड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित युवतीने याबाबतची फिर्याद दिली आहे.

Pornographic messages and videos on WhatsApp, | युवतीला व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज आणि व्हिडीओ,पोलीस पाटलावर गुन्हा

युवतीला व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज आणि व्हिडीओ,पोलीस पाटलावर गुन्हा

ठळक मुद्देपोलीस पाटलावर विनयभंगाचा गुन्हायुवतीला व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज आणि व्हिडीओ

कऱ्हाड : युवतीला व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस पाटलावर कऱ्हाड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित युवतीने याबाबतची फिर्याद दिली आहे.

रमेश बाबूराव खबाले असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पोलीस पाटलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अठरा वर्षीय युवती २६ जून रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास व्हॉटस्अ‍ॅपवर आॅनलाइन असताना पोलीस पाटील रमेश खबाले हा आॅनलाइन असल्याचे तिच्या निदर्शनास आले.

तिने त्याला एवढ्या उशिरापर्यंत जागे का आहात, असा मेसेज केला. त्या वेळी पोलीस पाटील असलेल्या रमेश खबाले याने तुझ्यामुळे असा रिप्लाय तिला दिला. त्या वेळी युवतीने मी काय केले, अशी विचारणा केली. त्यानंतर खबाले याने त्याच्या मोबाईलवरून युवतीला अश्लील व्हिडीओ पाठविला.

युवतीने त्याबाबत जाब विचारला असता खबाले याने मोबाईल बंद केला. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याने काही अश्लील मेसेज व व्हिडीओ पाठवले. युवतीने याबाबतची माहिती आईला दिल्यानंतर कुटुंबीयांनी कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रमेश खबाले याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Pornographic messages and videos on WhatsApp,